आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मेहनत घेऊ - प्रार्थना ठोंबरे

By admin | Published: July 14, 2016 09:33 PM2016-07-14T21:33:33+5:302016-07-14T23:01:41+5:30

आॅलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतात. या स्पर्धेत पदक जिंकणे अवघड असले तरी ते जिंकण्यासाठी सानिया आणि मी खडतर मेहनत

Work hard to win an Olympic medal - Pray Tomb | आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मेहनत घेऊ - प्रार्थना ठोंबरे

आॅलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मेहनत घेऊ - प्रार्थना ठोंबरे

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १४ - आॅलिम्पिकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावत असतात. या स्पर्धेत पदक जिंकणे अवघड असले तरी ते जिंकण्यासाठी सानिया आणि मी खडतर मेहनत घेऊ, अशी ग्वाही महाराष्ट्राची अव्वल टेनिस खेळाडू प्रार्थना ठोंबरे हिने गुरूवारी पुण्यात दिली.
प्रार्थना रिओ आॅलिम्पिकमध्ये महिला दुहेरी प्रकारात भारताची अव्वल खेळाडू सानियाच्या साथीने खेळणार आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आली असता पत्रकारांशी संवाद साधताना ती म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने मी आनंदी आहे. पण त्याहीपेक्षा जास्त आनंद झालाय तो सानियासोबत खेळण्याची संधी मिळणार असल्याने. लहानपणापासून ती माझी आयडॉल आहे. आॅलिम्पिकच्या निमित्ताने तिच्यासोबत खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. आमच्यासमोर दिग्गज खेळाडूंचे आव्हान असेल. असे असले तरी, आम्ही पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू . पहिलेच आॅलिम्पिक असले तरी मी आत्मविश्वासाने खेळणार आहे.’’

स्पर्धेचा ड्रॉ अद्याप जाहीर झाला नसल्याने आमच्यासमोर कुणाचे आव्हान असेल, याची कल्पना नाही. मात्र, जगातील दिग्गज खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी मी हैदराबादमध्ये सानियाच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. सेरेना-व्हिनस या विल्यम्स भगिनींसह जगभरातील अनेक नामांकित खेळाडू तेथे असतील. सानिया ही जगातील अव्वल क्रमांकाची दुहेरीची खेळाडू आहे. तिच्यासह खेळण्याचा अनुभव मला मिळणार आहे, असेही प्रार्थनाने नमूद केले. या वेळी विशाल चोरडिया, सुंदर अय्यर, प्राथर्नाचे वडील गुलाब ठोंबरे, अमेय येरवडेकर उपस्थित होते.
मूळची सोलापूरमधील बार्शीची असली तरी प्रार्थना आता वडिलांंसह हैदराबादला स्थायिक झाली आहे. तेथे ती सानिया मिर्झा अकादमीत सराव करते. सानियासह तिने नुकताच सरावाला प्रारंभ केला आहे. मागील १४ महिन्यांत तिने ११ विजेतीपदे पटकावली आहेत.

(सोलापूर - बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड )

सानियाचा फोरहॅण्ड जबरदस्त...
सानियाची गणना सध्या महिला दुहेरीतील जगातील सर्वोत्तम खेळाडूंत होते. तिला अशा सर्वोच्च दर्जाचे यश मिळवून देण्यात ‘फोरहॅण्ड’च्या फटक्याचा मोठा वाटा आहे. तिच्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा फोरहॅण्डचा फटका आत्मसात करण्याची प्रार्थनाची इच्छा आहे. यासाठी सानियाचे वडील मार्गदर्शन करीत असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, ‘‘इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादमध्ये सरावादरम्यान खेळातील कमकुवत बाबींवर मी लक्ष देत आहे. रिओतील वातावरण पूर्णत: भिन्न असेल. त्या परिस्थितीशी लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडू म्हणून आम्हाला वषर्षातील जवळपास ३० आठवडे जगातील वेगवेगळ्या भागात खेळावे लागते. त्यामुळे एखाद्या शहरातील वातावरणाशी लवकर जुळवून घेण्याची सवय करून घ्यावी लागते. रिओत दाखल झाल्यानंतर आम्हाला एकत्र सरावासाठी सुमारे एक आठवडा मिळेल.’’

 

Web Title: Work hard to win an Olympic medal - Pray Tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.