भारतीय रिले टीम पदकापासून वंचित राहिली; पण ४ खेळाडूंनी भल्याभल्यांना टक्कर दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 01:21 AM2023-08-28T01:21:02+5:302023-08-28T01:21:53+5:30

World Athletics Championship - नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर

World Athletics Championship - Indian men's 4x400m relay team (Muhammed Anas YAHIYA, Amoj JACOB, Muhammed Ajmal VARIYATHODI, Rajesh RAMESH ) finished on the 5th place clocking 2:59.92s in the World Athletics Championship at Budapest | भारतीय रिले टीम पदकापासून वंचित राहिली; पण ४ खेळाडूंनी भल्याभल्यांना टक्कर दिली

भारतीय रिले टीम पदकापासून वंचित राहिली; पण ४ खेळाडूंनी भल्याभल्यांना टक्कर दिली

googlenewsNext

World Athletics Championship - नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर सर्व भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या त्या पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीवर. भारतीय खेळाडूंनी हिट २ मध्ये आशियाई विक्रमासह फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण, पदकशर्यतीत अमेरिकन, जर्मन, फ्रेंच आणि जमैकन खेळाडूंसमोर भारतीय खेळाडू थोडे कमी पडले. त्यांना पाचव्या स्थानावर समाधाना मानावे लागले.

 Image
हिट २ मध्ये भारतीय संघाने आशियाई विक्रमाची नोंद करताना फायनमध्ये धडक दिली होती. मुहम्मद अनास, मुहम्मद अजमल, राजेश रमेश व अमोज जेकब या चौघांनी २ मिनिटे ५९.०५ सेकंदाची वेळ नोंदवून नवा आशियाई आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवला. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम हा ३:००.२५ सेकंद हा होता, तर आशियाई विक्रम २ मिनिटे ५९.५१ सेकंद ( जपान) हा होता. आज फायनलमध्ये त्यांनी २ मिनिटे ५९.९२ सेकंदाची वेळ नोंदवली. हिट २ पेक्षा जास्त वेळ आज त्यांनी घेतला. अमेरिकेने २ मिनिटे ५७.३१ सेकंदासह सुवर्ण, फ्रान्सने २ मिनिटे ५८.४५ सेकंदासह रौप्य, तर जर्मनीने २ मिनिटे ५८.७१ सेकंदासह कांस्यपदक जिंकले. 
Image

Web Title: World Athletics Championship - Indian men's 4x400m relay team (Muhammed Anas YAHIYA, Amoj JACOB, Muhammed Ajmal VARIYATHODI, Rajesh RAMESH ) finished on the 5th place clocking 2:59.92s in the World Athletics Championship at Budapest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.