Neeraj Chopra, World Athletics Championships : स्वप्नपूर्ती! नीरज चोप्राचे जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक पदक, १९ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 08:16 AM2022-07-24T08:16:49+5:302022-07-24T08:26:44+5:30
World Athletics Championships 2022 : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले.
Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेक पदक जिंकून देईत तो नीरज चोप्राच, असा आत्मविश्वास सार्थ ठरला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्या दोन प्रयत्नात ९० मीटर + भालाफेक करून अन्य स्पर्धकांना सुवर्णपदकापासून झटक्यात दूर केले. पहिल्या तीन फेऱ्यांमधील कामगिरीनंतर नीरज चौथ्या क्रमांकावर होता, परंतु त्याने पुनरागमन केले. चौथ्या प्रयत्नात नीरज थेट रौप्यपदकाच्या शर्यतीत आला अन् त्यानंतर तो मागे हटला नाही.
It's a historic World Championship Medal for #India 🇮🇳
— Athletics Federation of India (@afiindia) July 24, 2022
Olympic Champion Neeraj Chopra wins Silver Medal in men's Javelin Throw final of the #WorldAthleticsChamps with a throw of 88.13m
Congratulations India!!!!!!! pic.twitter.com/nbbGYsw4Mr
पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भालाफेकला अन् अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला होता. नीरजसमोर अंतिम फेरीत आव्हान होते ते ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सचे.. त्याने पात्रता फेरीत ८९.९१ मीटर लांब भालाफेक केला होता आणि तो माजी वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकचा जाकुब व्हॅदलेच व जर्मनीचा ज्युलियन वेबर हेही कडवे स्पर्धक होतेच. नीरजचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला, तेच रोहित यादवने ७७.९६ मीटर भालाफेक केला. पण, अँडरसनने पहिल्याच प्रयत्नात ९०.२१ मीटर लांब भालाफेक करून नीरजसमोर तगडे आव्हान ठेवले. त्यापाठोपाठ वेबरने ८६.८६ मीटर व जाकुबने ८५.५२ मीटर लांब भालाफेक केली.
नीरजचा दुसरा प्रयत्न हा ८२.३९ मीटर इतका राहिला. जाकुबने दुसऱ्या प्रयत्नात कामगिरी सुधारताना ८७.२३ मीटर लांब भालाफेकला.. अँडरसनने पुन्हा ९०.४६ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकावरील पकड घट्ट केली. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर लांब भालाफेक करून पदक शर्यतीत स्वतःला कायम राखण्याचा प्रयत्न केला. जाकुबने सुधारणा करताना ८८.०९ लांब भालाफेक करून रौप्यपदकावर दावा सांगितला. रोहितने तिसऱ्या प्रयत्नात ७८.७२ मीटर अशी कामगिरी सुधारली, परंतु तो टॉप ८मधून बाहेर फेकला गेला. त्याला १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
अखेरच्या तीन प्रयत्नांत नीरजला उलटफेर करण्याची संधी होती आणि त्याने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. रौप्यपदकावर दावा सांगणाऱ्या जाकुबने ८३.४८ मीटर भालाफेक केली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. नीरजने ऐतिहासिक रौप्यपदक नावावर केले.
#NeerajChopra 88.13m in fourth attempt, moves to silver medal position#WorldAthleticsChamps
— Athletics Federation of India (@afiindia) July 24, 2022
आजच्या दिवसाचे काही ठळक निकाल
- पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी नोंदवली. त्यांना उपांत्य फेरीत ३ मिनिटे ०७.२९ सेकंदाच्या वेळेसह अंतिम स्थानावर समाधान मानावे लागले. मुहम्मद अनास ( ४६.१५ सेकंद), मुहम्मद अजमल ( ४६.४१ से.), एन पंडी ( ४६.४३ से.) आणि राजेश रमेश ( ४८.३० से.) यांनी निराश केले.
- पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रथमच अंतिम फेरीत स्थान पटकाणाऱ्या भारतीयाचा मान एल्डोस पॉल ( Eldhose PAUL) ने पटकावला. अंतिम फेरीत पोर्तुगालच्या पेड्रो पिचार्डोने पहिल्याच प्रयत्नात १७.९५ मीटर लांब उडी मारून अन्य स्पर्धकांना सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले.
- तिहेरी उडीत भाताच्या पॉलने १६.३७ मीटर, १६.७९ मीटर, १३.८६ मीटर अशी कामगिरी केली आणि त्यामुळे तो अंतिम ८मधून बाहेर पडला. पॉलला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
India at World Athletics Championships: ऑलिम्पिकनंतर ८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर नीरज मैदानावर उतरला तेव्हापासून त्याने तीन स्पर्धांमध्ये स्वतःच्याच नाववर असलेला राष्ट्रीय विक्रम दोन वेळा मोडला. त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होताना दिसली आणि त्याने जागतिक स्पर्धेत ९० मीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. ऑलिम्पिकमध्ये त्याने ८७.५८ मीटर या कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले होते आणि त्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख हा चढाच राहिला आहे. १४ जूनला फिनलँड येथील तुर्कू येथे झालेल्या Paavo Nurmi स्पर्धेत त्यानं ८९.३० मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. चार दिवसांनी फिनलँडच्या कौर्टने येथील स्पर्धेत त्याने ८६.६९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर ३० जूनला स्वीडन येथे पार पडलेल्या डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर लांब भाला फेकून राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक नावावर केले होते.