विश्वचषकातील ‘बेंच स्ट्रेंथ’चा आयपीएलमध्ये जलवा

By admin | Published: April 11, 2016 02:07 AM2016-04-11T02:07:44+5:302016-04-11T02:07:44+5:30

वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा टी-२० विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य नव्हता, आॅफ स्पिनर हरभजन सिंगला विश्वकप स्पर्धेत संधी मिळाली नाही तर अजिंक्य रहाणे जवळजवळ राखीव खेळाडूंमध्ये बसलेला होता.

World Bench Strength in the World Cup in the IPL | विश्वचषकातील ‘बेंच स्ट्रेंथ’चा आयपीएलमध्ये जलवा

विश्वचषकातील ‘बेंच स्ट्रेंथ’चा आयपीएलमध्ये जलवा

Next

नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा टी-२० विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य नव्हता, आॅफ स्पिनर हरभजन सिंगला विश्वकप स्पर्धेत संधी मिळाली नाही तर अजिंक्य रहाणे जवळजवळ राखीव खेळाडूंमध्ये बसलेला होता. पण, या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलच्या नवव्या पर्वातील सलामी लढतीत आपली छाप सोडली.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएलच्या नवव्या पर्वातील नवा संघ राइजिंग पुणे सुपरजायन्ट्सने गत विजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध ३२ चेंडू व ९ गडी राखून विजय साकारला. ईशांत व रहाणे पुणे संघाचे सदस्य होते तर हरभजन मुंबई संघाचा खेळाडू आहे.
ईशांतचा परफेक्ट स्टार्ट
वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने मुंबई इंडियन्सच्या डावात सुरुवातीला दोन बळी घेते त्याच्यावर केवळ कसोटी गोलंदाज असल्याचा टॅग लावणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले. ईशांतने सुरुवातीच्या दोन षटकांत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताच्या आशा संपुष्टात आणणाऱ्या लेंडल सिमन्सला बाद करीत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर ढकलले. सुरुवातीच्या या धक्क्यातून गत चॅम्पियन संघ अखेरपर्यंत सावरला नाही. ईशांतने ३६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. पुणे संघाच्या विजयात ईशांतचा स्पेल महत्त्वाचा ठरला.
भज्जीची अष्टपैलू चमक
आॅफ स्पिनर हरभजन सिंगला आशिया कप स्पर्धेत केवळ एक लढत खेळण्याची संधी मिळाली तर विश्वकप स्पर्धेत त्याला संधीही मिळाली नाही, पण हरभजनने आयपीएलच्या या लढतीत अष्टपैलू कामगिरी करताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चूक असल्याचे सिद्ध केले. हरभजनला उपांत्य लढतीत संधी मिळायला पाहिजे होती. त्याऐवजी मनीष पांडेला पाचारण करीत अंतिम संघात स्थान देण्यात आले होते. हरभजनने मुंबई इंडियन्सतर्फे ३० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद ४५ धावा केल्या. शिवाय १ बळीही घेतला.
रहाणेची फलंदाजी
नाबाद ६६ धावांची खेळी करीत पुणे संघाला विजय मिळवून देत सामनावीर ठरलेल्या रहाणेवर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा अधिक विश्वास नसतो. रहाणेला विश्वकप स्पर्धेत केवळ एक लढत (सेमीफायनल) खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले होते. पण, रहाणेने त्याला पूर्ण संधी मिळणे आवश्यक असल्याचे सिद्ध केले. रहाणेने ४२ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी केली. एक्सपर्टच्या भूमिकेत असलेल्या वकार युनूसने या फलंदाजाला अधिक संधी मिळायला पाहिजे होती, असे मत व्यक्त केले.

Web Title: World Bench Strength in the World Cup in the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.