जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा निर्णायक भूमिका बजावणार’
By admin | Published: November 2, 2014 12:54 AM2014-11-02T00:54:46+5:302014-11-02T00:54:46+5:30
यंदाची जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबईमध्ये रंगणार असल्याने मुंबईकरांना जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
Next
यंदाची जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबईमध्ये रंगणार असल्याने मुंबईकरांना जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. डिसेंबर महिन्यात रंगणा:या या स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ) संघटनेने कंबर कसली असून, स्पर्धेच्या आयोजनाबाबत देशाचे नाव कुठेही कमी न पडण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. यानिमित्ताने आयबीबीएफचे जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे यांनी ‘लोकमत’च्या रोहित नाईक बरोबर केलेली खास बातचित.
भारतात रंगणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे खास आकर्षण काय आहे?
- यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयबीबीएफच्या वतीने महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन होत आहे. त्याचबरोबर मुख्य शरीरसौष्ठव व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या नियमानुसार फिटनेस फिजिक, अॅथलिट फिजिक, स्पोर्ट फिजिक यासारख्या गटात देखील स्पर्धा रंगणार आहे. अनेकांना बॉडीबिल्डिंगमध्ये रस असतो. मात्र, त्यासाठी विशेष मेहनत व प्रशिक्षण घ्यावे लागते. यामुळे काहीजण स्लीम-ट्रिम फिजिक करण्यावर भर देतात; मात्र त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसतो. अशा हौशी खेळाडूंना या नव्या नियमांनुसार संधी मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या राज्य निवड स्पर्धेतून 21 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. यापैकी कोणत्या सवरेत्तम खेळाडूंकडून अपेक्षा आहेत?
- वरिष्ठ गटात म्हणाल, तर संग्राम चौगुले नक्कीच राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो. तो भलेही 2 वर्षानंतर खेळत असेल; मात्र त्याच्यात देशाचे नाव उंचावण्याची क्षमता आहे. शिवाय, आशिष साखरकर आणि उदयोन्मुख सुमीत जाधवकडूनदेखील फार अपेक्षा आहेत. तसेच, महिला गटामध्ये महाराष्ट्रासमोर मणिपूर आणि प. बंगालचे आव्हान असेल. शिवाय, अॅथलेटिक, मॉडेल, स्पोर्ट्स अशा गटांमध्ये मिहिर सिंग, झुनैद, मुस्तफा, श्वेता राठोड, स्टेफी डिसूझा हे खेळाडू आपली चमक दाखवू शकतात. राष्ट्रीय संघामध्ये महाराष्ट्राचे कमीत कमी 3 ते 4 खेळाडू नक्कीच आपली जागा निश्चित करू शकतील.
राज्य निवड स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिलांची स्पर्धा झाली. या वेळी प्रतिसाद कसा होता?
- खूपच चांगला प्रतिसाद होता. आजर्पयत कोणत्याही स्पर्धेत आम्हाला 7क्-8क् स्पर्धकांचा सहभाग लाभला नव्हता. फिटनेस गटासाठी 4क्-45, तर महिला गटात तब्बल 2क्-25 खेळाडूंचा सहभाग लाभला. महिलांची स्पर्धा अत्यंत रंगतदार झाली. त्यामुळे आगामी स्पर्धातदेखील ही संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास आहे.
महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी संघटनेतर्फे कोणत्या उपाय-योजना करण्यात येतील?
- आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या अंतर्गत यंदाचे वर्ष महिला स्पर्धासाठी शेवटचे आहे. महिला व पुरुष शरीरयष्टी वेगळी असून, त्यानुसारंच शरीराची निगरानी राखावी, असा निर्णय आंतरराष्ट्रीय संघटनेने घेतल्याने, फिटनेस, अॅथलेटिक, स्पोर्ट्स, मॉडेल अशा गटांमध्ये स्पर्धा घेऊन या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणोकरून महिलांनादेखील यामध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.
भारताला जागतिक स्पर्धेत कोणत्या देशाकडून कडवी झुंज मिळेल?
- इराण. गेल्या कित्येक वर्षापासून इराणचे खेळाडू जगज्जेते आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांचे खेळाडू पदकांची लयलूट करीत असतात. शिवाय, अफगाणिस्तानचे खेळाडू स्पर्धेत निर्णायक भूमिका बजावतील, तरी गेल्या काही स्पर्धाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांनी देखील वर्चस्व प्रस्थापित केले असून, कसलेल्या संघासमोर भारतीय खेळाडूदेखील यशस्वी ठरतील.
या खेळामध्ये सर्वसामान्य
कुटुंबातील खेळाडूंचा समावेश
जास्त असून, अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. घरा-घरांमध्ये हा खेळ पोहोचविण्यासाठी काय करणार?
- भारत सरकारच्या क्रीडा मंत्रलयाकडून आम्हाला एनओसी मिळाली असली, तरी अनुदानाची तरतूद अजूनही झालेली नाही. आज जागतिक स्तरावरील स्पर्धाचे आयोजन आम्ही करीत असून देखील आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत नसल्याची खंत आहे. त्यामुळे आमच्या प्रयत्नांना मर्यादा येतात. प्रत्येक स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आर्थिक मदतीसाठी वणवण फिरावे लागते. तरी देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाचा चाहतावर्ग निर्माण करण्यास यश मिळविले असून, नवोदित व महिला खेळाडूंना या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी यंदाची जागतिक स्पर्धा निर्णायक कामगिरी करेल.