विश्व बॉक्सिंग : मेरी कोमची अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:17 PM2018-11-22T17:17:00+5:302018-11-22T17:19:28+5:30
मेरीने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किंग हँग मीवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे.
नवी दिल्ली : पाच वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या एम. सी. मेरी कोम (४८ किलो) दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मेरीने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किंग हँग मीवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीत मेरीने किंग हँग मी हिच्यावर 5-0 असा विजय मिळवला.
यापूर्वी पाच वेळा मेरीने जगज्जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आता सहव्यांदा मेरी विश्व चॅम्पियन होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. अंतिम फेरीत मेरीला युक्रेनच्या हाना ओखओटाशी झुंज द्यावी लागणार आहे. हा सामना शनिवारी 24 नोव्हेंबरला होणार आहे.
Five-time world champion India’s MC #MaryKom storms into final of the AIBA Women's World Boxing Championships 2018 beating North Korea’s Kim Hyang-Mi in the semi-final#boxingpic.twitter.com/GvNHEsfCch
— Doordarshan News (@DDNewsLive) November 22, 2018
Women's Boxing World Championships: MC Mary Kom beats North Korea's Kim Hyang Mi in the semi-final to enter the final. (file pic) pic.twitter.com/xzXO9pVpDa
— ANI (@ANI) November 22, 2018