विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन कार्निव्हल’

By admin | Published: April 4, 2016 03:18 AM2016-04-04T03:18:13+5:302016-04-04T03:18:13+5:30

रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले.

World Caribbean Games 'Caribbean Carnival' | विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन कार्निव्हल’

विश्वविजेतेपदाचा ‘कॅरेबियन कार्निव्हल’

Next

कोलकाता : रविवारचा दिवस वेस्ट इंडिज आणि टी २० क्रिकेटसाठी इतिहास घडवणारा ठरला...सायंकाळी विंडिजच्या महिलांनी बलाढ्य आॅस्ट्रेलियन संघाला नमवत प्रथमच जगज्जतेपद पटकावले. तर रात्री भारताला हरवत अंतिम फेरी गाठणाऱ्या विंडिजच्या पुरुष संघाने पराभवाच्या उंबरठ्यावर असताना शेवटच्या षटकातील कार्लोस ब्रेथवेटच्या सलग चार षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर इंग्लंडला धूळ चारत विश्वविजेतेपदावर दुसऱ्यांदा मोहोर उमटवली. त्यानंतर ईडन गार्डनवर ‘कॅरेबियन कार्निव्हल’च साजरा झाला.


ज्याच्या खेळीवर संघाच्या विजयाचे गणित अवलंबून असते तो तुफानी ख्रिस गेल स्वस्तात बाद झाला.... त्याआधी संपूर्ण स्पर्धेत संघातील सर्वात यशस्वी फलंदाजही केवळ एक धाव काढून बाद झाला... तर उपांत्य सामन्यात यजमान भारताविरुध्द एकहाती विजय मिळवून देणारा लेंडल सिमन्सही शून्यावर परतल्यानंतर वेस्ट इंडिज इंग्लंडविरुद्ध हातातील विजेतेपद गमावणार असेच चित्र टी२० अंतिम सामन्यात होते. मात्र एका बाजूला खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्लन सॅम्युअल्सने अखेरपर्यंत संघाचा किल्ला लढवताना नाबाद ८५ धावांचा विजयी तडाखा देत संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेपदाचा मान मिळवून दिला. तरी सर्वांच्या लक्षात राहिला तो अंतिम सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा कार्लोस ब्रेथवेट. अखेरच्या सहा चेंडूवर विंडिजला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता असताना ब्रेथवेटने चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकत विजयश्री खेचून आणली.
>हा ठरला टर्निंग पॉइंट...
सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यष्टीरक्षक जोस बटलरने सॅम्युअल्सचा झेल घेतला आणि इंग्लंडने जल्लोष करण्यास सुरुवात केली. यावेळी विंडिजची अवस्था ३ बाद ३७ धावा अशी होती आणि त्यात सॅम्युअल्सचा बळी जात होता. मात्र रिप्लेमध्ये बटलरकडून झेल घेताना चेंडू जमिनीला टेकल्याचे स्पष्ट झाले व सॅम्युल्सला नाबाद ठरला. पुढे त्यानेच संघासाठी विजयी खेळी केली. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
2012
सालीदेखील अंतिम फेरीत सॅम्युअल्सने श्रीलंकेविरुध्द ७८ धावा कुटताना संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा विराट कोहलीनंतर (२७३) जो रुट (२४९) दुसऱ्या क्रमांकावर. टी२० विश्वचषकमध्ये विंडिज इंग्लंडविरुध्द अद्यापही अपराजित.
24
धावा वेस्ट इंडिजने अखेरच्या षटकात फटकावल्या. हा आंतरराष्ट्रीय
टी२० मधील विश्वविक्रम आहे.
>अखेरच्या षटकात
युवराजची आठवण...
२००७ साली झालेल्या पहिल्या वहिल्या टी२० विश्वचषकात विजेता ठरलेल्या भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विंडिजच्या ब्रेथवेटनेही काहीसा असाचा प्रयत्न करताना इंग्लंडविरुध्द अखेरच्या षटकात पहिल्या चार चेंडूवर षटकार ठोकून युवीची आठवण करुन दिली.
2010
साली विजेतेपद पटकावलेल्या इंग्लंडचे पहिलेच उपविजेतेपद
एकाच विश्वचषक स्पर्धेत एकाच देशाच्या दोन संघांनी बाजी मारण्याची पहिलीच वेळ
दोन वेळा टी२० विश्वचषक पटकावणारा वेस्ट इंडिज पहिला संघ.
दोन वेळा अंतिम फेरी गाठताना वेस्ट इंडिजने दोन्ही वेळा शानदार
बाजी मारली.

Web Title: World Caribbean Games 'Caribbean Carnival'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.