वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:52 AM2018-01-18T03:52:39+5:302018-01-18T03:52:43+5:30

वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिस हिला पराभूत करून मी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय नोंदवला.

The World Champion had not even thought of defeating | वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता

वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत करण्याचा विचारही केला नव्हता

Next

- पूजा धांडा, पंजाब रॉयल्स
वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारोलिस हिला पराभूत करून मी माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय नोंदवला. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या लढतीआधी मी जय-पराजयचा कोणताही विचार केला नव्हता. मी केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. नशिबाने या लढतीआधी मी ट्युनिशियाची आणखी एक आॅलिम्पिक पदक विजेती मार्वा आमिरी हिच्याविरुद्ध लढले. या लढतीतून अनेक गोष्टी शिकता आल्या आणि त्याचा फायदा हेलेनविरुद्ध झाला.
मार्वाने मला चांगल्या प्रकारे जखडवून ठेवले होते. तिने केलेल्या चालीचा वापर मी या लढतीमध्ये करून आक्रमक पवित्रा घेतला. ही रणनीती यशस्वी ठरली आणि मी काही गुण मिळवण्यात यशस्वी ठरले. हेच मला पाहिजे होते. तांत्रिक कारणामुळे मिळालेले ४ गुण माझा आत्मविश्वास वाढवणारा ठरले. माझ्या पाठीराख्यांनीही जयघोष करत स्टेडियम दणाणून सोडले. या विजयामुळे मी खरंच खूप आनंदित आहे; पण सर्व काही येथेच संपत नसल्याची जाणीवही आहे.
पुढच्या लढतीमध्ये मी संगीता फोगटच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. तीसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये असून तिनेही वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केले आहे. ती एक चांगली रेसलर असल्याची शंकाच नाही. एकदा मी तिच्याविरुद्ध पराभूत झाले आहे, पण तो अपवाद वगळता नेहमीच मी तिच्यावर वरचढ ठरली आहे. या लढतीत विजय मिळवण्याचा मला विश्वास आहे. त्याहून जास्त राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती ओडुनयोविरुद्धच्या लढतीकडे माझे जास्त लक्ष लागले आहे. मला तिचा खेळ जवळून जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. कारण यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत माझी पहिल्या फेरीत ओडुनयोविरुद्ध खेळण्याची शक्यता जास्त आहे. यूपी दंगल संघाच्या वेनेसा कलाद्झींस्काया हिची पकड करण्यात मी अपयशी ठरले, असे अनेकांचे मत आहे. पण मी या मताशी सहमत नाही. खरं म्हणजे वेनेसाने जे यश आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवले आहे, तेवढे यश मी मिळवू शकले नाही. ती माझ्याहून खूप अनुभवी खेळाडू आहे. यासाठी मी माझ्या पंजाब रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकांच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन करते. आता हेलेनविरुद्धच्या विजयानंतर माझा आत्मविश्वास उंचावला असून यामुळे मला आणि माझ्या संघाला नक्कीच खूप फायदा होईल.
गतवर्षी मी दुखापतीतून सावरून या लीगमध्ये सहभागी झाले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही माझी पहिलीच स्पर्धा होती. मी त्यावेळी फार चांगली कामगिरी करु शकले नव्हती. पण एकूणच वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन खेळाडूंविरुद्ध खेळताना मिळालेला अनुभव आत्मविश्वास उंचावणारा ठरला. हेलेनसारख्या आॅलिम्पिक चॅम्पियनला वर्षभरात नमविण्याचा मी कधीच विचारही केला नव्हता. यजमान म्हणून जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याचे स्वातंत्र्य आम्हाला देण्यात मिळाले. ही संधी सर्व खेळाडूंना दिल्याबद्दल डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण आणि प्रोस्पोर्टिफायचे कार्तिकेय शर्मा यांचे मी मनापासून आभार मानते.

Web Title: The World Champion had not even thought of defeating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.