जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूचा एकतर्फी विजय, श्रीकांतचीही आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 09:22 AM2021-12-15T09:22:04+5:302021-12-15T09:22:45+5:30

सिंधूने तिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर वरचष्मा राखला.

World Championships PV Sindhu Kidambi Srikanth Lakshya Sen Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty advance | जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूचा एकतर्फी विजय, श्रीकांतचीही आगेकूच

संग्रहित छायाचित्र

Next

हुएलवा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सुरुवात केली. मंगळवारी झालेल्या सामन्यात सिंधूने स्लोवाकिायाच्या मार्टिना रेपिस्कावर २१-७, २१-९ असा एकतर्फी विजय मिळवला. या संपूर्ण सामन्याच तिने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्यावर वरचष्मा राखला. त्यामुळे सिंधूच्या झंझावातापुढे मार्टिनाचा निभाव लागला नाही. 

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या सिंधने हा सामना केवळ २४ मिनिटांमध्येच खिशात घातला. २०१९ मध्ये सिंधूने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात सुरुवातीलाच सिंधूने ११-४ ची आघाडी घेतली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने ही आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही. पहिला गेम सिंधूने १० मिनिटांमध्येच जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने पुन्हा आक्रमक सुरुवात करत ११-१ ची आघाडी घेतली. पुढे हीच आघाडी कायम राखत तिने सामन्यात विजय मिळविला.

श्रीकांत पुढच्या फेरीत
दुसरीकडे पुरुषांच्या सामन्यात किदांम्बी श्रीकांतनेही पुढची फेरी गाठताना १२व्या मानांकित चीनच्या ली शी फेंगला  १ तास ९ मिनिटे चाललेल्या सामन्यात १५-२१, २१-१८ ने पराभूत केले तर उदोन्मुख खेळाडू लक्ष सेननेही जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असणाऱ्या केंटा नाशिमोटोला २२-२०, १५-२१, २१-१८ ने पराभूत करत पुढत्या फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत सात्विकसाईसाज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने चीन तायपेईच्या झी हुएइ आणि यांग पो सुआन जोडीचा केवळ २३ मिनिटात २७-२५, २१-१५ ने खुर्दा उडवला. मिश्र दुहेरीत मात्र भारतीय जोडी सौरभ शर्मा आणि अनुष्का पारिखला पराभवाचा सामना करावा लागला. 

Web Title: World Championships PV Sindhu Kidambi Srikanth Lakshya Sen Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.