वर्ल्डकप, आशिया चषकासाठी संघाची निवड ५ रोजी

By admin | Published: February 4, 2016 03:41 AM2016-02-04T03:41:45+5:302016-02-04T03:41:45+5:30

बांगलादेशामध्ये होणारी आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धा आणि वर्ल्डकप ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत करणार आहे.

World Cup, Asia Cup squad for selection | वर्ल्डकप, आशिया चषकासाठी संघाची निवड ५ रोजी

वर्ल्डकप, आशिया चषकासाठी संघाची निवड ५ रोजी

Next

मुंबई : बांगलादेशामध्ये होणारी आगामी आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धा आणि वर्ल्डकप ट्वेंटी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समिती ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत करणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार ही बैठक ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होईल. त्यात आशिया कप आणि वर्ल्ड ट्वेंटी-२० साठी संघ निवडला जाणार आहे. भारत आपल्या भूमीवर ९ फेब्रुवारी रोजी ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर येथेच वर्ल्डकप ट्वेंटी-२० चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे.
आशिया कप स्पर्धा २४ फेब्रुवारी ते ६ मार्चदरम्यान आयोजित केली जाणार आहे. त्याआधी १९ ते २२ फेब्रुवारीदरम्यान ४ संघ क्वालिफाइंग लढती खेळणार आहेत. त्यातून स्पर्धेसाठी एक क्वालिफायर संघ निश्चित होणार आहे. भारत मिरपूर येथे होणाऱ्या या स्पर्धेत यजमान बांगलादेशाशी दोन हात करेल. त्यानंतर २७ रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान व १ मार्च रोजी श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. ३ मार्च रोजी त्यांचा सामना क्वालिफायर संघाशी होईल. आशिया कप प्रथमच ट्वेंटी-२० स्वरूपात आयोजित होत आहे.

Web Title: World Cup, Asia Cup squad for selection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.