चॅम्पियन्सचा वर्ल्डकप : 2002 आणि 2004

By admin | Published: May 29, 2017 03:49 AM2017-05-29T03:49:55+5:302017-05-29T03:49:55+5:30

२00२ साली श्रीलंकेत भरविण्यात आलेली ही स्पर्धा पहिल्यांदा ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अंतिमसामन्यात पावसाच्या

World Cup of Champions: 2002 and 2004 | चॅम्पियन्सचा वर्ल्डकप : 2002 आणि 2004

चॅम्पियन्सचा वर्ल्डकप : 2002 आणि 2004

Next

२00२ साली श्रीलंकेत भरविण्यात आलेली ही स्पर्धा पहिल्यांदा ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अंतिम
सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळेभारत आणि श्रीलंका या दोन संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेतेपद देण्यात आले. २00४ मध्येया स्पर्धेचे
यजमानपद इंग्लंडला मिळाले. दिग्गज खेळाडूब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाने या स्पर्धेचेविजेतेपद मिळविले.

२00२ भारत, श्रीलंका संयुक्त मानकरी


आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी असे पहिल्यांदा नामक रण झालेली २00२ची ही स्पर्धा श्रीलंकेत भरविण्यात आली. खरं तर ही स्पर्धा भारतात होणार होती; परंतुक रमणूक करावरून वाद झाल्याने स्पर्धा श्रीलंकेत घेण्याचा निर्णय झाला. अंतिम सामना वगळता ही स्पर्धा चांगली यशस्वी झाली. अंतिम सामना दोनदा खेळवूनही पावसानेखोडा घातल्याने स्पर्धेचे विजेतेपद विभागून देण्यात आले.
या स्पर्धेत एकूण १५ सामने खेळविण्यात आले. सर्वसामनेक ोलंबोतील आर. प्रेमदासा आणि एसएससी स्टेडियवर
खेळविण्यात आले. दहा क सोटी खेळणाऱ्या देशांसह, केनिया आणि नेदरलँड असे१२ देश यामध्ये सहभागी झालेहोते. यांचे चार गट पाडण्यात आले होते. प्रत्येक गटात तीन संघांचा समावेश होता. चार गटांतील अव्वल संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले. यामध्ये
भारत, दक्षिण आफ्रिका, आॅस्ट्रेलिया आणि यजमान श्रीलंकेचा समावेश होता. अंतिम लढत भारत आणि श्रीलंक ा यांच्यात झाली.
भारताचा समावेश पूल बीमध्ये होता. या गटात इंग्लंड आणि झिम्बाब्वे हे आणखी दोन संघ होते. सौरव गांगुलीच्या
नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेला हरवून स्पर्धेची झोकात सुरु वात केली. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर मात क रू न गटात
अव्वल स्थान मिळवीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यफेरीत भारतानेदक्षिण आफ्रिकेला धूळ चारू न अंतिम फेरीत प्रवेश केला. या
सामन्याचा हीरो होता तो वीरेंद्र सेहवाग. अर्धशतक ी खेळी क रणाऱ्या वीरू ने गोलंदाजीतही क माल दाखवताना २५ धावांत
३ बळी घेत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आणले. दुसरीक डे आॅस्ट्रेलियावर एक तफर् ी मात क रीत यजमान श्रीलंकेने फ ायनल गाठली. लंकेनेआॅस्ट्रेलियाला ४८.४ षटक ांत १६२ धावांत गुंडाळून तीन गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. स्पर्धेचा अंतिम सामना मात्र दोन्ही देशांसाठी दुर्दैवी होता. २९ सप्टेंबर २00२ रोजी झालेल्या फ ायनलमध्ये श्रीलंकेने प्रथम
फ लंदाजी क रताना ५ बाद २४४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या डावातील दोन षटके झाल्यानंतर धुवाधार पावसाने मैदानाचे तळे झाले. त्यामुळे हा सामना रद्द क रण्यात आला. अंतिम सामन्यासाठी दुसरा दिवस राखीव होता. ३0 सप्टेंबर
२00२ रोजी विजेतेपदासाठी पुन्हा अंतिम लढत झाली. यात श्रीलंकेला ७ बाद २२२ धावांवर रोखल्यानंतर भारताने १ बाद ३८ धावा केल्या असताना पुन्हा जोरदार पावसाला सुरु वात झाली. यामुळे दुसऱ्या दिवशीचा सामनाही रद्द क रावा लागला.
डक वर्थ-लुईस नियमाप्रमाणे सामन्याचा निक ाल ठरविण्यास दुसऱ्या डावातील कि मान २५ षटके खेळ होणे अनिवार्य असल्याने
शेवटी स्पर्धेत भारत आणि श्रीलंक ा यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताच्या वीरेंद्रसेहवागनेसर्वाधिक २७१ धावा के ल्या,
तर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने सर्वाधिक १0 बळी घेतले

२00४ विंडीज चॅम्पियन

चौथी चॅम्पियन्स ट्रॉफ ी स्पर्धा २00४ साली इंग्लंडमध्ये भरविण्यात आली. क सोटी खेळणारे दहा देश यात सहभागी झालेहोते. याशिवाय केनिया आणि अमेरिक ा हेदोन देशही या स्पर्धेत खेळले. सहा देशांच्या पात्रता फेरीतील स्पर्धेत नामिबिया, कॅ नडा, नेदरलँड, स्क ॉटलंड, युएईयांना मागेटाक त अमेरिकेने आश्चर्यक ारक पणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफ ीत सहभाग मिळविला. अमेरिकेचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण मात्र सलग दोन पराभवामुळे संपुष्टात आले. स्पर्धेचे स्वरू प हे२00२ च्या स्पर्धेसारखेच होते. यावेळी भारताच्या गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकि स्तानसह केनियाचा समावेश होता. भारताने केनियावर ८८ धावांनी मात क रीत स्पर्धेला झोक ात प्रारंभ केला. परंतु, पुढच्या सामन्यात भारताला पाकि स्तानक डून पराभूत व्हावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकि स्तान आणि वेस्ट इंडीज हे चार संघ सेमीफ ायनलमध्ये
पोहोचले. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश
मिळविला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला हरवून फायनल गाठली.
प्रथम फ लंदाजी क रणाऱ्या पाकि स्तानचा विंडीजने अवघ्या १३१ धावांत खुर्दा केला. हे छोटेखानी आव्हान विंडीजने २८.१ षटक ांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्णक रू न विजेतेपदाक डे वाटचाल केली. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडला विजेतेपदाचे दावेदार मानले जात असताना ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला धूळ चारू न आयसीसी ट्रॉफ ीचे पहिले विजेतेपद पटक ाविले. इंग्लंडला २१७ धावांत रोखल्यानंतर विंडीजनेहेआव्हान २ गडी आणि ७ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. इंग्लंडच्या मार्क स्ट्रेस्क ोथिक नेसर्वाधिक २६१ धावा के ल्या, तर अँड्र्यू फ्लिंटॉफ ने सर्वाधिक ९ गडी बाद केले. वेस्ट इंडीजच्या रामनरेश सर्वन याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूम्हणून गौरविण्यात आले.

Web Title: World Cup of Champions: 2002 and 2004

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.