विश्वचषक क्रिकेट पॉइंटर -१

By admin | Published: February 22, 2015 12:18 AM2015-02-22T00:18:49+5:302015-02-22T00:18:49+5:30

World Cup cricket pointer -1 | विश्वचषक क्रिकेट पॉइंटर -१

विश्वचषक क्रिकेट पॉइंटर -१

Next
>वेस्ट इंडिज- पाकिस्तान लढत पॉइंटर :
* १५०..: एकदिवसीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज संघाचा पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विजय. यापूर्वी विंडीजने पाकला १९९२ मध्ये सिडनी येथे १३३ धावांनी पराभूत केले होते.
* ०० ... : ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे पाकिस्तान संघ २८० धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरले आहे. ११ वेळा त्यांना अशी संधी मिळाली होती, पण त्यांना विजय नोंदविता आला नाही. २००४ मध्ये वेलिंग्टन येथे ३०८ धावांचा पाठलाग करताना त्यांना अवघ्या ४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
* ०१.. : पाकिस्तान संघाची एक धाव झाली होती तेव्हा त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते. यापूर्वीचा विक्रम कॅनडा संघाच्या नावावर आहे. २००६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे झिम्बाब्वे संघाने त्यांची अशी स्थिती केली होती.
* ५१ ..: वेस्ट इंडिजच्या ३१० धावांमध्ये ५१ ही सर्वोच्च धावसंख्या होती. ३०० अधिक धावांमध्ये ५१ ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी ३०१ धावसंख्या असताना ५६ ही कमी संख्या होती, जेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने २००५ मध्ये जोहान्सबर्ग येथे झिम्बाब्वेविरुद्ध केली होती.
* ८९ .. : वेस्ट इंडिज संघाने शेवटच्या ६ षटकांत केल्या. त्या १०, १४, १३, १३, २२, १७ अशा होत्या. त्यांनी ११५ धावा शेवटच्या १० षटकांत केल्या आहेत. या स्पर्धेत अशी धावसंख्या होण्याची ही पाचवी वेळ आहे. शेवटच्या १० षटकांत १०० पेक्षा जास्त धावा केल्या गेल्या आहेत.
* २०१.३ ... : आंद्रे रसेलचा मागील चार एकदिवसीय लढतींमध्ये २०१.३ स्ट्राईक रेट होता. त्याने ११ षटकांत ७८ चेंडूंत १५७ धावा केल्या आहेत आणि तो फक्त एकदाच बाद झाला आहे.
* ११८.६ ..: दिनेश रामदीनचा ५१ धावा करताना ११८.६ चा स्ट्राईक रेट होता. ही धावसंख्या त्याने ४३ चेंडूंत केली. रामदीनची ही तिसरी अधिक ५० धावांची खेळी आहे. गतवर्षी बांगलादेशविरुद्ध १२१ चेंडूंत १६९; तर २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूंत ४३ धावा केल्या आहेत.
* ७०१ ...: दिनेश रामदीनने २०१४ च्या सुरुवातीपासून १८ एकदिवसीय डावांमध्ये ७०१ धावा केल्या आहेत. या काळात विंडीजकडून केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
०००००

Web Title: World Cup cricket pointer -1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.