विश्वचषक उद्घाटन जोड
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:06+5:302015-02-13T00:38:06+5:30
समारंभाला आजीमाजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणार्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
Next
स ारंभाला आजीमाजी खेळाडूंसोबत ८० बालके होती. या वेळी सहभागी १४ देशांचे प्रतिनिधित्व करणार्या १४ मैदानांना ४ विभागांत विभागण्यात येऊन प्रतीकात्मक क्रिकेट खेळविण्यात आले. सर्व चारही विभागांपुढे व्यासपीठ बनविण्यात आले होते. या व्यासपीठावर भारत आणि श्रीलंकेच्या सांस्कृतिक कलावंतांसह वेस्ट इंडीजचा स्टील बँड, स्कॉटलंड आणि आयर्लंडच्या कलावंतांनी व स्थानिक माओरी हाका समूहानेदेखील कला सादर केली. हजारावर कलावंतांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.न्यूझीलंडमध्ये उपस्थित असलेल्या सर्व संघांच्या कर्णधारांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह प्रेक्षकांपुढे हजेरी लावली. मोठ्या व्यासपीठावर विश्वचषक ठेवण्यात आला होता. पहिल्यांदा स्पर्धेत खेळणार्या अफगाण संघाचा कर्णधार मोहंमद नबी याचे सर्वप्रथम आगमन झाले. पाठोपाठ बांगलादेशाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा, इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन, गतविजेत्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आयर्लंडचा कर्णधार विल्यम्स पोर्टरफिल्ड, पाकचा कर्णधार मिस्बाह उल् हक, स्कॉटलंडचा कर्णधार प्रेस्टन मौमसेन, यूएईचा मोहंमद तौकीर, विंडीजचा जेसन होल्डर आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क हे व्यासपीठावर आले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स म्हणाला, 'माझ्या संघाने कधीही विश्वचषक जिंकलेला नाही; पण यंदा सवार्ेत्कृष्ट तयारीसह आलो आहोत. ट्रॉफी मायदेशी घेऊन जाण्यास उत्सुक आहोत.' रविवारी द. आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचे आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा म्हणाला, 'माझा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही; पण या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे, की जो संघ सामन्याच्या दिवशी सवार्ेत्तम क्रिकेट खेळेल तो जिंकू शकतो.'ख्राईस्टचर्चचा नागरिक असलेला न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम म्हणाला, 'ख्राईस्टचर्च ज्या पद्धतीने संकटातून सावरला त्यानंतर विश्वचषकाचे हे शानदार आयोजन आहे. हा विश्वचषक कुणीही जिंकू शकतो. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियात चांगल्या खेळप्या असल्याने मॅचविनर मोलाची भूमिका वठवू शकतात. प्रत्येक संघात मॅचविनर असून ते १०-१५ षटकांत सामन्याचा निकाल फिरवू शकतात.' (वृत्तसंस्था) ०००..................................................