विश्वकप सराव

By Admin | Published: February 13, 2015 11:11 PM2015-02-13T23:11:09+5:302015-02-13T23:11:09+5:30

विश्वकप सराव

World Cup practice | विश्वकप सराव

विश्वकप सराव

googlenewsNext
श्वकप सराव
अफगाणिस्तानची युएईवर मात
मेलबोर्न : अफगाणिस्तानने विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातचा (युएई) १४ धावांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तान संघाने निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३०८ धावांची दमदार मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या युएई संघाचा डाव ४८.२ षटकांत २९४ धावांत गुंडाळला. युएईतर्फे ४३ वर्षीय डावखुरा फलंदाज खुर्रम खानने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. अफगाणिस्तानतर्फे आफताब आलम सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी घेतले तर मोहम्मद नबीने दोन फलंदाजांना माघारी परतवले.
त्याआधी, एकवेळ ३ बाद ५० अशी अवस्था असलेल्या अफगाणिस्तान संघानेसमीउल्ला शेनवारी (५८) व नजिबुल्ला जादरन (४६) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मीरवाईज अशरफ (नाबाद ३४) आणि गुल्बादिन नाईव्ह (२४) यांनी आक्रमक खेळी करीत अफगाणिस्तान संघाला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. विश्वकप स्पर्धेत कॅनबरा येथे अफगाणिस्तान संघाला १८ फेब्रुवारी रोजी बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे तर संयुक्त अरब अमिरात संघाची सलामी लढत झिम्बाब्वेविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: World Cup practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.