वर्ल्डकपच्या तयारीस प्रारंभ
By admin | Published: November 2, 2014 01:02 AM2014-11-02T01:02:55+5:302014-11-02T01:02:55+5:30
भारतीय संघ रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणा:या वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने विश्वकप स्पर्धेची तयारी करण्यास प्रयत्नशील आहे.
Next
वन-डे मालिका : भारत-श्रीलंका पहिली लढत आज
कटक : विंडीज संघाने वन-डे सामन्यांची मालिका अर्धवट सोडल्यानतंर यजमान भारतीय संघ रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणा:या वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने विश्वकप स्पर्धेची तयारी करण्यास प्रयत्नशील आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील आयोजित सामने विश्वकपचे यजमान असलेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांच्या तुलनेत वेगळ्या खेळपट्टय़ांवर होणार असले, तरी या मालिकेच्या निमित्ताने गतविजेत्या भारतीय संघाला प्रभारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपल्या युवा खेळाडूंची क्षमता तपासून पाहण्याची संधी मिळाली आहे. नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पाच सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांत विश्रंती देण्यात आली आहे.
बोर्डासोबत मानधनाच्या मुद्दय़ावर झालेल्या वादामुळे गेल्या महिन्यात वेस्ट इंडीज संघाने मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने तातडीने श्रीलंकेसोबत मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघ लसिथ मलिंगा, सुरांगा लकमल, अजंता मेंडिस व रंगना हेराथ यांच्याविना भारतात दाखल झाला आहे. मलिंगा व लकमल दुखापग्रस्त असून फिरकीपटू मेंडिस व हेराथ उपलब्ध नाहीत.
मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली भारतीय ‘अ’ संघाने 3क् ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5क् षटकांच्या सराव सामन्यात 382 धावांची दमदार मजल मारली होती. या लढतीत रोहित शर्माने 142, तर मनीष पांडेने नाबाद 135 धावांची खेळी केली होती. कोहली सध्या पुन्हा लय गवसण्यासाठी प्रयत्नशील आहे. सलामीवीर म्हणून अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यामध्ये चुरस आहे. या मालिकेत भारतीय फलंदाज धावा फटकावण्यास उत्सुक आहेत.
इंग्लंडच्या निराशाजनक दौ:यानंतर सूर गवसण्यासाठी कोहलीला चौथ्या स्थानावर फलंदाजीला यावे लागले. कोहलीने चौथ्या स्थानावर खेळताना दिल्लीमध्ये विंडीजविरुद्ध 62 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतरच्या लढतीत तिस:या स्थानावर खेळताना त्याने 127 धावांची खेळी केली होती. कोहलीवर पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळण्याचे दडपण राहणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, वरुण अॅरोन, अक्षर पटेल, शिखर धवन, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अंबाती रायडू, अमित मिश्र व धवल कुलकर्णी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संघकारा, माहेला जयवर्धने, अशन प्रियंजन, निरोशन डिकवेला, थिसारा परेरा, नुवान कुलशेखरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमागे, चतुरंगा डिसिल्वा, सिकुगे प्रसन्ना व सूरज रंधीव.
सामन्याची वेळ : दुपारी 1.3क् पासून.