विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:57 AM2021-03-22T02:57:09+5:302021-03-22T02:57:23+5:30

कोरिया सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कीसह ५३ देशांच्या २९४ नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

World Cup Shooting: Gold for India's women's and men's air pistol teams; Impressive performance of young players | विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी

विश्वचषक नेमबाजी: भारताच्या महिला व पुरुष एअर पिस्तूल संघांना सुवर्ण; युवा खेळाडूंची प्रभावी कामगिरी

googlenewsNext

नवी दिल्ली : भारताने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकप नेमबाजीमध्ये १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वर्चस्व गाजवताना रविवारी पुरुष महिला या दोन्ही विभागांत सुवर्णपदक पटकावले. भारताची यशस्विनी सिंग देसवाल, मनू भाकर व श्री निवेथा यांच्या संघाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल टीम स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. 

त्यानंतर युथ ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा व शाहजार रिजवीच्या संघाने पुरुष विभागात अंतिम फेरीत व्हिएतनामचा १७-११ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. शनिवारी २३ वर्षीय देसवालने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत मायदेशातील सहकारी भाकरला पिछाडीवर सोडत सुवर्णपदक पटकावले होते. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये चौधरीने रौप्य, तर वर्माने कांस्य पदक पटकावले. कोरिया सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन, इराण, युक्रेन, फ्रान्स, हंगेरी, इटली, थायलंड आणि तुर्कीसह ५३ देशांच्या २९४ नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

क्वालिफिकेशनमध्येही राखले वर्चस्व

महिला विभागात भारतीय संघाने सुवर्णपदकाच्या लढतीत १६ शॉट लगावले आणि पोलंडच्या जुलिता बोरेक, योआना इवोना वावरजोनोवस्का व एग्निस्का कोरजवो यांना पिछाडीवर सोडले. कर्णी सिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पोलंड संघाला केवळ ८ गुण मिळविता आले. भारतीय संघाने दुसऱ्या क्वालिफिकेशनमध्ये ५७६ गुण नोंदवीत अव्वल स्थान मिळविले होते, तर पोलंडचा संघ ५६७ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.पहिल्या क्वालिफिकेशनमध्ये भारतीय खेळाडूंनी सहा सिरीजमध्ये २९०, २८७, २८८, २९३ आणि २८७ 
सह एकूण १७३१ गुण नोंदविले. पोलंडने २८६, २८३, २८६, २८६, २८६ आणि २८७ च्या सिरीजसह १७०१ गुण नोंदविले.
 

Web Title: World Cup Shooting: Gold for India's women's and men's air pistol teams; Impressive performance of young players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.