नवी मुंबईमध्ये होणार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा
By admin | Published: February 18, 2016 06:30 AM2016-02-18T06:30:05+5:302016-02-18T06:30:05+5:30
जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल आॅफ फुटबॉल असोशिएशन) २०१७ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरु ळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत
प्राची सोनवणे, नवी मुंबई
जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल आॅफ फुटबॉल असोशिएशन) २०१७ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरु ळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. फीफा चे संचालक जेवीयर सेप्पी यांनी बुधवारी डी.वाय पाटील स्टेडियमची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. प्रत्येक चार वर्षांनी १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे.
२०१७ च्या फटबॉल विश्वचषक सामन्यांकरिता झालेली निवडीने नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.या स्पर्धेतील प्रमुख सामने नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्टेडियमची ६५ हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या या खेळांचे थेट प्रक्षेपण करणार आहेत. फिफा पथकाने विश्वचषकासाठी कोलकाता, नवी दिल्ली, कोच्ची, गुवाहाटी, नवी मुंबई आणि गोवा या सहा अस्थायी आयोजन स्थळांपैकी नवी मुंबईची निवड केली
आहे.
चांगल्या गुणवत्तेच्या मैदानांची आम्ही अपेक्षा करत असून नेरुळमधील डी.वाय पाटील क्रीडा संकुलाची निवड खरोखरच योग्य असून फीफा पथकाने सर्वेक्षण करून हा निर्णय घेतल्याचे वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझेस यांनी सांगितले. आॅक्टोबर २०१६ पर्यंत या मैदांनातील किरकोळ सुधारणा केल्या जाणार असून वर्षभर आधी हे मैदान खेळाकरिता सज्ज ठेवले जाणार आहे. फीफा पथकाचे जॉय भट्टाचार्य
यांनीही यावेळी या मैदानाची पहाणी केली. नेरुळमधील क्रीडासंकुलाची निवड हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. सर्वच फुटबॉल जगाच या टुर्नामेंटकडे लक्ष असते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करावे. इतर देशातील क्रीडा संकुलांपेक्षा भारतातील नवी मुंबई शहरातील हे डि.वाय पाटील क्रीडा संकुलाला सर्वोवत्कृष्ट क्रीडा संकुलाचे स्थान मिळाले आहे.
- विजय पाटील,
अध्यक्ष, डी. वाय. पाटील अॅकॅडमीचे