विश्वचषकाआधी युवा खेळाडूंना संधी देणार : प्रसाद

By admin | Published: July 1, 2017 02:05 AM2017-07-01T02:05:19+5:302017-07-01T02:05:19+5:30

इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या विश्वचषकाआधी युवा खेळाडूंना देशाकडून खेळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन दिली जाईल.

Before the World Cup, young players will be given a chance: Prasad | विश्वचषकाआधी युवा खेळाडूंना संधी देणार : प्रसाद

विश्वचषकाआधी युवा खेळाडूंना संधी देणार : प्रसाद

Next

तिरुपती : इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या विश्वचषकाआधी युवा खेळाडूंना देशाकडून खेळण्याची जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन दिली जाईल. या महत्त्वाच्या स्पर्धेआधी दुसऱ्या फळीला अनुभव मिळावा हा हेतू असल्याची माहिती राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनंी दिली.
विश्वचषकापर्यंत भारताला किमान ५५ वन डे सामने खेळायचे आहेत. या सामन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांची प्रतिभा ओळखण्याचा प्रयत्न केला जाईल. नवे खेळाडू विश्वचषकापर्यंत ४०-५० सामने खेळून अनुभव प्राप्त करू शकतात, असे प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाककडून झालेल्या पराभवाबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले, ‘सुरुवातीला चांगली कामगिरी करणारा भारतीय संघ असा दारुण पराभूत झाला हे पाहणे दुर्दैवी आहे. फायनलमध्ये असा पराभव निराश करणारा ठरला. विश्वचषकाची तयारी डोळ्यापुढे ठेवून चुका सुधारण्यावर आम्ही भर देणार आहोत.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Before the World Cup, young players will be given a chance: Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.