जगातील सर्वोत्तम खेळाडूला कन्यारत्न; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:09 PM2020-05-19T16:09:48+5:302020-05-19T16:10:40+5:30
जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट याच्या घरी पाळणा हलला आहे.
जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट याच्या घरी पाळणा हलला आहे. त्याची गर्लफ्रेंड केसी बेनेट हिनं एका मुलीला जन्म दिला आहे. जमैकाचे पंतप्रधान अँण्ड्य्रू होलनेस यांनी सोशल मीडियावरून ही बातमी देताना बोल्टचं अभिनंदन केलं.
होलनेस ने ट्विटरव लिहीले की,''दिग्गज धावपटू उसेन बोल्ट आणि केसी बेनेट यांच्या घरी नन्ही परी आली. त्यांचे अभिनंदन.'' स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार रविवारीच बोल्टच्या घरी ही परी आली. 33 वर्षीय बोल्टनं मार्च महिन्यात बापमाणूस बनणार असल्याचे जाहीर केले होते.
Congratulations to our sprint legend Usain Bolt (@usainbolt) and Kasi Bennett on the arrival of their baby girl! pic.twitter.com/bheXPgU7Qd
— Andrew Holness (@AndrewHolnessJM) May 18, 2020
ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणाऱ्या बोल्टच्या नावावर अजूनही 100 व 200 मीटर शर्यताची वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यानं 2017मध्ये निवृत्ती जाहीर केली होती. 2016मध्ये त्यानं सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत 100 व 200 मीटर शर्यतीचं जेतेपद पटाकवण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा तो एकमेव पुरुष धावपटू आहे.
Athletics great #UsainBolt and his long-time girlfriend Kasi Bennett welcomed their first child, Jamaican prime minister Andrew Holness confirmed in a congratulatory tweet. pic.twitter.com/xMlly8Oy0b
— Doordarshan Sports (@ddsportschannel) May 19, 2020
शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काश्मीर संघाचे नेतृत्व करायचे आहे!
प्रेक्षकांविना खेळणे म्हणजे, वधुशिवाय विवाह करणे; शोएब अख्तर
मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग