रणजी स्पर्धेत गुजरातच्या सलामीवीराने रचला विश्वविक्रम

By admin | Published: December 27, 2016 02:45 PM2016-12-27T14:45:06+5:302016-12-27T14:52:07+5:30

रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुजरातच्या सलामीवीराने नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

World record for highest score in Ranji Trophy | रणजी स्पर्धेत गुजरातच्या सलामीवीराने रचला विश्वविक्रम

रणजी स्पर्धेत गुजरातच्या सलामीवीराने रचला विश्वविक्रम

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 27 -  ओदिशा विरुद्ध सुरु असलेल्या रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गुजरातच्या सलामीवीराने नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. गुजरातच्या सामित गोहेलने सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 
 
सलामीला आलेल्या सामितने नाबाद 359 धावा फटकावल्या. यापूर्वी सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम  सरेच्या बॉबी अबेल यांच्या नावावर होता. त्यांनी 1899 साली ओव्हलच्या मैदानावर सॉमरसेट विरुद्ध नाबाद 357 धावा केल्या होत्या. 
 
गोहेलने 723 चेंडूंचा सामना करताना 359 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 45 चौकार आणि षटकार लगावला. गुजरातचा दुसरा डाव  641 धावांवर आटोपला. अंतिम दिवशी ओदिशाला विजयासाठी 706 धावांचे लक्ष्य दिले आहे.  
 
 

Web Title: World record for highest score in Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.