श्रीलंकेच्या रंगना हेराथचा वर्ल्ड रेकॉर्ड, डॅनियल व्हिटोरीला टाकलं मागे

By admin | Published: March 12, 2017 03:40 PM2017-03-12T15:40:34+5:302017-03-12T15:40:34+5:30

बांगलादेशविरूद्ध गॉलमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 259 धावांनी विजय मिळवला.

The world record of Sri Lanka's Rangana Herath, behind Daniel Vitori | श्रीलंकेच्या रंगना हेराथचा वर्ल्ड रेकॉर्ड, डॅनियल व्हिटोरीला टाकलं मागे

श्रीलंकेच्या रंगना हेराथचा वर्ल्ड रेकॉर्ड, डॅनियल व्हिटोरीला टाकलं मागे

Next
>ऑनलाइन लोकमत
गॉल, दि.12 - बांगलादेशविरूद्ध गॉलमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 259 धावांनी विजय मिळवला. या विजयात श्रीलंकेचा फिरकी गोललंदाज रंगना हेराथने महत्वाची भूमिका बजावली. बांगलादेशच्या दुस-या डावात त्याने 59 धावा देऊन 6 विकेट घेतल्या. या दमदार पर्फोर्मन्सच्या बळावर हेराथने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला.  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा डाव्या हाताचा गोलंदाज तो बनला.   
 
गॉल कसोटीतल्या प्रदर्शनामुळे हेराथ कसोटी क्रिकेटमधला सर्वात यशस्वी डावखूरा गोलंदाज बनला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज डावखूरा फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरीला त्याने मागे टाकलं. व्हिटोरीने 362 विकेट घेतल्या आहेत तर हेराथने आतापर्यंत 79 कसोटीत 366 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात 59 धावा देऊन 6 विकेट घेत 29 वेळा एखाद्या मॅचमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम हेराथने केला. यासोबत त्याचा समावेश दिग्गजांच्या श्रेणीत झालाय. मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि अनिल कुंबळे यांच्या श्रेणीत तो पोहोचला आहे. 
 
अशा प्रकारे कोणते लक्ष्य गाठणं नक्कीच चांगली गोष्ट आहे, खूप कमी जणांना 400 विकोट घेण्यात यश आलंय , मी  400 विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. टीमसाठी आणि देशासाठी चांगलं प्रदर्शन करत राहिल अशी प्रतिक्रिया हेराथने दिली.  

Web Title: The world record of Sri Lanka's Rangana Herath, behind Daniel Vitori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.