जागतिक स्नूकर : पंकज अडवानीचा १८वा पराक्रम, इराणच्या आमिरला नमवून मिळवले जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:13 AM2017-11-28T02:13:17+5:302017-11-28T02:13:28+5:30

भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले.

 World Snooker: Pankaj Advani won the 18th title, defeating Iran's Aamir | जागतिक स्नूकर : पंकज अडवानीचा १८वा पराक्रम, इराणच्या आमिरला नमवून मिळवले जेतेपद

जागतिक स्नूकर : पंकज अडवानीचा १८वा पराक्रम, इराणच्या आमिरला नमवून मिळवले जेतेपद

Next

दोहा : भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना तब्बल १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद उंचावले. पंकजने १८वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना इराणच्या आमिर सरखोश याचे आव्हान परतावले.
अल-अरबी स्पोटर््स क्लब येथे झालेल्या या अंतिम सामन्यात पंकजने ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत आपल्या खात्यात आणखी एका विश्व विजेतेपदाची भर टाकली. बेस्ट आॅफ १५ यानुसार खेळविण्यात आलेल्या या लढतीत सरखोशने पहिला फ्रेम जिंकत अनपेक्षित सुरुवात केली होती. मात्र, यानंतर पंकजने सलग चार फ्रेम जिंकताना ४-१ अशी आघाडी मिळवत आपला हिसका दिला. सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा सरखोशने १३४ गुणांसह बाजी मारत आपली पिछाडी २-४ अशी कमी केली. मात्र, यानंतर जराही एकाग्रता न गमावलेल्या पंकजने जबरदस्त नियंत्रण सादर करताना पुन्हा एकदा सलग चार फ्रेम जिंकत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले.
एकतर्फी झालेल्या या लढतीत पंकजने १९-७१, ७९-५३, ९८-२३, ६९-६२, ६०-०५, ०-१३४, ७५-०७, १०३-०४, ७७-१३, ६७-४७ असा दिमाखदार विजय मिळवला. याआधी झालेल्या उपांत्य सामन्यात पंकजने आॅस्ट्रियाच्या युवा फ्लोरियन नूबल याचे आव्हान
७-४ असे संपुष्टात आणले होते.
११ पैकी ४ फ्रेम जिंकत नूबलने
आपली चमक दाखवली खरी; परंतु कसलेल्या पंकजपुढे त्याचा निभाव लागला नाही. (वृत्तसंस्था)

Web Title:  World Snooker: Pankaj Advani won the 18th title, defeating Iran's Aamir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.