World U-20 Championship: कोल्हापूरचा रांगडा गडी जिंकला! कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:43 PM2021-08-18T20:43:13+5:302021-08-18T20:44:17+5:30
World U-20 Championship: ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूनं देशाची मान उंचावली आहे.
World U-20 Championship: ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूनं देशाची मान उंचावली आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापुर जिल्ह्यातील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील यानं स्पर्धेक कांस्य पदकाची कमाई केली आहे. यासोबतच नैरोबी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानंही चमकदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
BRONZE FOR PATIL! 🥉
— JSW Sports (@jswsports) August 18, 2021
Another Bronze medal for #TeamIndia as Pruthviraj Babasaheb Patil wins 2-1 in a close contest against Ivan Kirillov 🇷🇺 in the 92kg category! 🇮🇳 #BetterEveryday#WrestleUfapic.twitter.com/DNSZgtDpqn
मराठमोळ्या पृथ्वीराज पाटील यानं ९२ किलो वजनी गटात रशियन कुस्तीपटू इवान किरिलोव याचा २-१ असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं आहे. दुसरीकडे ४ बाय ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये भारतीय संघानं ३ मिनिटं २०.६० सेकंदांचा आजवरचा सर्वोत्तम वेळेची नोंद करुन नवा इतिहास रचला आहे. अब्दुल रझ्झाक, प्रिया मोहन, सम्मी आणि कपिल यांचा समावेश असलेल्या संघानं अंतिम फेरीत दमदार कामगिरीची नोंद केली.
Official time 3:20.60, a season best for #TeamIndia 4*400m mixed relay team & a Bronze medal at the #U20WorldChampionships#Nairobi
— Athletics Federation of India (@afiindia) August 18, 2021
📸 @nitinarya99pic.twitter.com/dndikEIZwn
रविंदरची रौप्य पदकाची कमाई
ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ६१ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत भारताचा कुस्तीपटू रविंदरचा इराणच्या रहमान मौसा यानं ३-९ असा पराभव केला. रविंदरनं रौप्य पदकाची कमाई केली. तर ७४ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू यश यानं कझाकिस्तानच्या स्टॅमबूल झ्यानबेक याचा १२-६ अशा मोठ्या फरकानं पराभव करुन कांस्य पदकाची कमाई केली आहे.