विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:53 PM2019-09-16T23:53:42+5:302019-09-16T23:54:22+5:30

गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती.

World Wrestling Championships: gurpreet lost the match | विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

Next

नवी दिल्ली : भारताच्या गुरप्रीत सिंगने कडवी लढत दिल्यानंतरही सोमवारी येथे विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या चुरशीच्या लढतीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा मल्ल व्हिक्टर नेमेसविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. सर्बियाच्या मल्लाला अधिक बचावात्मक पवित्रा स्वीकारल्यामुळे एका गुणाची पेनल्टी देण्यात आली होती. पहिल्या पिरियडनंतर गुरप्रीत १-० ने आघाडीवर होता.
दुसºया सत्रामध्ये गुरप्रीतने अधिक बचावात्मक पवित्रा स्वीकारल्यामुळे गुण गमावला. दरम्यान, व्हिक्टरने गुरप्रीतला मॅटबाहेर करण्याचा प्रयत्न केला, पण सर्कलच्या काठावर संतुलन गमावल्यामुळे भारतीय मल्लासोबत बाहेर पडला. तरी रेफरीने सर्बियाच्या मल्लाला दोन गुण बहाल केले. भारतीय प्रशिक्षक हरगोविंद यांनी या निर्णयाला आव्हान दिले, पण निर्णय त्यांच्याविरुद्ध गेला. त्यामुळे गुरप्रीतने आणखी एक गुण गमावला. सर्बियाच्या मल्लाने त्यानंतर आपली आघाडी कायम राखत पुढील फेरी गाठली.
व्हिक्टरला त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कजाखस्तानच्या अशखत दिलमुखामेदोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गुरप्रीतची रेपेचेजच्या माध्यमातून पदक पटकावण्याची आशा संपुष्टात आली. व्हिक्टरविरुद्धच्या पराभवापूर्वी गुरप्रीतने शानदार सुरुवात करताना आॅस्ट्रियाच्या मायकल वॅगनरला चित केले.
मनीषने ६० किलो वजन गटतील १/१६ च्या लढतीत फिनलँडच्या लारी योहानेस मेखोनेनचा पराभव केला. भारतीय मल्ल एकवेळ ०-३ ने पिछाडीवर होता, पण त्यानंतर सलग ११ गुण वसूल करीत त्याने तांत्रिक सरसतेच्या आधारावर विजय नोंदवला. मनीषला त्यानंतर पुढच्या फेरीत मालदोवाच्या जागतिक क्रमवारीतील तिसºया क्रमांकाचा मल्ल व्हिक्टर सियोबानूविरुद्ध तांत्रिक सरसतेच्या आधारावर पराभव स्वीकारावा लागला. मालदोवाच्या मल्लाला त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या केनिचिरो फुमिताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मनीष पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. नवीनला १३० किलो वजन गटात पात्रता फेरीत २०१८ पॅन अमेरिका चॅम्पियन क्युबाच्या आॅस्कर पिनो हिंडाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: World Wrestling Championships: gurpreet lost the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.