विश्व कुस्ती स्पर्धेत साक्षी, बजरंगकडे भारताचे नेतृत्व; संघात ३० कुस्तीपटूंचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:36 AM2018-10-09T04:36:20+5:302018-10-09T04:38:12+5:30
बुडापेस्ट (हंगेरी) येथे २० ते २८ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारताचा ३० सदस्यीय संघ पाठविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : बुडापेस्ट (हंगेरी) येथे २० ते २८ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारताचा ३० सदस्यीय संघ पाठविण्यात येणार आहे. या संघाचे नेतृत्व आॅलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियायांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाने फ्रिस्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला कुस्ती गटात १०-१० खेळाडूंची निवड केली आहे. बजरंग (६५किलो) फ्रिस्टाईल गटात पदकाचा दावेदार आहे.
महिला गटात साक्षीवर बºयाच आशा अवलंबून असतील. सुवर्णपदक विजेता पूजा ढांडा (५७ किलो) हिच्याकडूनही सुवर्णपदकाच्या आशा असतील. जगमिंदर सिंह फ्रिस्टाईल संघाचे मुख्य प्रशिक्षक तर कुलदिप मलिक हे महिला संघाचे प्रशिक्षक असतील. ३० कुस्तीपटूंसोबतच १७ अधिकाºयांचा समावेश आहे. यामध्ये प्रशिक्षक, फिजियो, पंच असतील. संघ उद्या बुडापेस्टला रवाना होईल. फोगाट भगिनींमध्ये केवळ रितू हिला संधी मिळाली आहे. गीता आणि बबिता चाचणीत सहभागी होऊ शकल्या नव्हत्या.
आशियाई सुवर्णपदक विजेती खेळाडू विनेश फोगट दुखापतग्रस्त आहे. महिला संघाचे प्रशिक्षक कुलदीप मलिक म्हणाले की, ‘आम्ही विश्व स्पर्धेसाठी पूर्ण तयार आहोत. सर्व मल्ल तंदुरुस्त असून महिला कुस्तीपटूंनी आपल्या तांत्रिक खेळावर खूप मेहनत घेतली आहे. ते स्पर्धेत यशस्वी ठरतील. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर त्यांच्याकडून मोठी आशा आहे.’ (वृत्तसंस्था)