अभिमानास्पद; एका किडनीवर अंजू बॉबी जॉर्जनं भारताला मिळवून दिली अनेक पदकं!
By स्वदेश घाणेकर | Published: December 8, 2020 02:54 PM2020-12-08T14:54:42+5:302020-12-08T15:46:36+5:30
भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जनं ( Anju Bobby George) सोमवारी एक धक्कादायक माहिती दिली.
भारताची माजी ऑलिम्पिकपटू अंजू बॉबी जॉर्जनं ( Anju Bobby George) सोमवारी एक धक्कादायक माहिती दिली. एका किडनीवर तिनं भारतासाठी दैदिप्यमान कामगिरी केली. तिच्या या माहितीनंतर सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे. एका मूत्रपिंडाद्वारे आपण २००३च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक पटकावून अन्य स्पर्धामध्येही यश संपादन केले, असा गौप्यस्फोट ऑलिम्पियन लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने केला आहे.
२००३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते आणि आतापर्यंत जागतिक स्पर्धेत एकाही भारतीय खेळाडूला ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये पदक जिंकता आलेलं नाही. अंजू ही एकमेव खेळाडू आहे. ''२०००च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. तेव्हा मला हे कळलं... मी कशीबशी चालू शकत होते. हळुहळू मी सरावाला सुरुवात केली, परंतु माझं शरीर साथ देत नव्हतं. तरीही मी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कमबॅक केले. अडथळ्यांवर मात करत, वेदनाशामक गोळ्या घेऊन मी हे यश मिळवले. जागतिक स्पर्धेत एका मूत्रपिंडाद्वारे भाग घेणारी कदाचित मी पहिली खेळाडू असेन. माझी गुणवत्ता किंवा प्रशिक्षकांची जादू असे या यशाचे वर्णन करता येईल,''असेही अंजू म्हणाली.
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ''अंजूने आपली जिद्द, प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले.''
Believe it or not, I'm one of the fortunate, among very few who reached the world top with a single KIDNEY, allergic with even a painkiller, with a dead takeoff leg.. Many limitations. still made it. Can we call, magic of a coach or his talent @KirenRijiju@afiindia@Media_SAIpic.twitter.com/2kbXoH61BX
— Anju Bobby George (@anjubobbygeorg1) December 7, 2020
अंजू बॉबी जॉर्जची कामगिरी
२००३ ( पॅरीस) जागतिक अजिंक्यपद स्पर्धा - कांस्यपदक
२००५ ( माँटे कार्लो) जागतिक अॅथलेटिक्स फायनल - सुवर्णपदक
२००२ ( मँचेस्टर) राष्ट्रकुल स्पर्धा - कांस्यपदक
२००२ ( बुसान) आशियाई स्पर्धा - सुवर्णपदक
२००६ ( दोहा) आशियाई स्पर्धा - रौप्यपदक
२००५ ( इंचॉन) आशियाई अजिंक्यपद - सुवर्णपदक
२००७ ( अम्मान) आशियाई अजिंक्यपद - रौप्यपदक
२००६ ( कोलंबो) दक्षिण आशियाई स्पर्धा - सुवर्णपदक