बांगालादेश दौऱ्याविषयी मॉर्गनला चिंता
By admin | Published: July 5, 2016 08:20 PM2016-07-05T20:20:22+5:302016-07-05T20:20:22+5:30
नुकताच बांगलादेशमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर इंग्लंडचा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट संघाचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने आगामी आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे
ऑलाइन लोकमत
लंडन, दि. ५ : नुकताच बांगलादेशमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर इंग्लंडचा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट संघाचा कर्णधार इआॅन मॉर्गन याने आगामी आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशची राजधारी ढाका येथील एका रेस्टॉरंटमध्ये अतिरेक्यांनी विदेशी नागरिकांवर हल्ला केला होता.
या अतिरेकी हल्ल्यामध्ये २० जणांचा मृत्यु झाला होता. या घटनेकडे लक्ष वेधताना मॉर्गनने चिंता व्यक्त करताना सांगितले की, ह्यह्यबांगलादेश दौऱ्याविषयी मला खूप काळजी आहे.ह्णह्ण त्याचबरोबर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे (ईसीबी) प्रवक्ताने देखील सांगितले होते की, ७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या बांगलादेश दौऱ्याबाबत आम्ही सरकारच्या निर्देशाचे पाल करु. या दौऱ्यात इंग्लंड तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
आम्ही मोठे निर्णय ईसीबीकडे सोपवतो. ईसीबी या दौऱ्यासाठी एक अहवाल तयार करेल. तसेच आम्ही दौऱ्यावर जाण्याआधी बोर्डच्या वतीने काही अधिकारी बांगलादेशला जाऊन खेळाडूंच्या सुरक्षिततेची खातरजमा करतील. मात्र, सध्या या दौऱ्याबाबत आमची चिंता वाढली आहे,ह्णह्ण असे मॉर्गनने यावेळी सांगितले. दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसन यांनी आशा व्यक्त केली आहे की, इंग्लंड क्रिकेट संघ आपया पुर्वनियोजित कार्यक्रमानुसारच बांगलादेश दौऱ्यावर येईल.