व्हॉट्स अॅपवरचा राग
By Admin | Published: March 27, 2015 01:52 AM2015-03-27T01:52:42+5:302015-03-27T01:52:42+5:30
भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला.
भारत सेमीफायनलमध्ये हरला आणि एक अब्ज भारतीयांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांमध्ये अत्यंत प्रभावी माध्यम झालेल्या व्हॉट्स अॅपवर लोकांची क्रिएटिव्हिटी उतू जात होती आणि त्यांनी मुख्यत: टीकेचं लक्ष्य केलं विराट कोहली नी सिडनीत सामना बघायला गेलेल्या अनुष्का शर्माला. व्हॉट्स अॅपवर फिरत असलेल्या मेसेजची ही एक झलक...
अनुष्का शर्मा ‘राष्ट्रीय-पनवती’ म्हणून घोषित!
साईबाबा आजका मॅच जीता देना...
साईबाबा - बेटा सिडनी है, शिर्डी नही!
बाई पाई पेशवाई गेली, कोहली क्या चिज है
घाबरु नका मित्रानो आपला जुना वर्ल्डकप आहे,
तो आपण पिताम्बरी ने धुऊ, अजुन ५ वर्ष वापरु
अनुष्का भाभी के ढिले पड़ गए तेवर
ना संया चले, ना देवर
कलमुँही, दिलजली, चुड़ैल,
भिखारी, हरामी मरने गयी
आॅस्ट्रेलिया में, मेरे बच्चे का
जीना हराम कर दिया:
- विराट की माँ
ठेच लागल्यावर जसा
बाप आठवतो,
तसा धोनीला आज
युवराज आठवत असेल,
गर्लफ्रेंडसाठी शतक
ठोकणारे भरपूर आहेत,
पण कॅन्सर झालेला असताना,
भारताला विश्वचषक
जिंकून देणारा,
फक्त युवराज होता...
गंभीरने युवराजला फोन केला ... हॅलो : हा..हा..हा..हा.., युवराज : हा...हा... थांब विरूला कॉन्फरन्स वर घेतो
३२९ धावांमध्ये भारताला ५० % सबसिडी देण्याची आठवलेंची मागणी
आज सुट्टी घेतलेल्या लोकांसाठी सेट मॅक्सवर सूयर्वंशम मुव्ही सरू.
धोनीने विराटला सांगितले जास्तीत जास्त वेळ शर्मा सोबत राहण्याचा प्रयत्न कर. पण, थोडे मिस अंडरस्टॅँडिंग झाले अन् त्याला वेगळीच शर्मा वाटली...