मोठी बातमी : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर खुनाचा आरोप, दिल्ली पोलिसांच्या रडारवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 12:12 PM2021-05-06T12:12:09+5:302021-05-06T12:12:36+5:30
भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.
भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. सुशील कुमारवर खुनाचा आरोप आहे. माजी विश्वविजेत्या सुशुल कुमारवर २३ वर्षीय ज्युनियर नॅशनल चॅम्पियन खेळाडूच्या खुनाचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मंगळवारी रात्री छत्रसाल स्टेडियमवर दोन गटांत मंगळवारी रात्री हाणामारी झाली आणि त्यात ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूची हत्या झाली. भारतात IPL 2021 आयोजन करण्याच्या निर्णयाचं सौरव गांगुलीनं केलं समर्थन; स्थगितीनंतर करावा लागतोय आव्हानांचा सामना
नॉर्थ वेस्ट दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. गुरिकबाल सिंग सिंधू यांनी सांगितले की,''सुशील कुमारवरील आरोपांचा आम्ही तपास करत आहोत. आम्ही आमची एक टीमही सुशील कुमारच्या घरी पाठवली होती, आम्ही त्याचा शोध घेत आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक टीम तयार केल्या आहेत.'' सब इन्स्पेक्टर जितेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या FIRच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार सुशील कुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी खुन केल्याचे समोर येत आहे. FIRमधील नोंद नुसार चार तास ही हाणामारी चालली. विराट कोहली कोरोनाविरुद्धच्या लढ्यात युवा सेनेसह उतरला मैदानावर; IPL 2021 स्थगितीनंतर लागला कामाला
या हाणामारीत जीव गमावलेल्या कुस्तीपटूचं नाव सागर कुमार असं आहे आणि तो दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. सोनू महल (वय, 35) आणि अमित कुमार (वय 27) हे दोघं जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (वय 24) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे.मानलं MS Dhoni ला; संघातील प्रत्येक खेळाडू रवाना झाल्यानंतरच रांचीला जाणार कॅप्टन कूल
सुशील कुमारची कामगिरी
सुशील कुमारनं २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते, त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्यपदकाची कमाई केली. २०१०च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले. २०१०, २०१४ व २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदकं आहेत.