Corona Virus : 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:03 PM2020-04-17T13:03:05+5:302020-04-17T13:04:23+5:30
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. भारतातील कोरोना रुग्णाचा आकडा 13,495 झाला असून आतापर्यंत 448 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 'दंगल गर्ल' बबिता फोगाटनं देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरताना वादग्रस्त ट्विट केलं.
कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है।
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 15, 2020
जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati
या पोस्टवरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. अत्यंत खालच्या पातळीवर तिच्यावर टीका होत असून अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. 2019च्या हरयाणा राज्याच्या निवडणूकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या बबिताच्या समर्थनात काहींनी ट्विट केलं आहे. ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही बबिताचे समर्थन केले.
त्यात बबितानं शुक्रवारी एक व्हिडीओ पोस्ट करून तबलिगींवर निशाणा साधला आहे.
पाहा व्हिडीओ...
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020
बबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
IPL 2020 होणार?; BCCI समोर 'या' देशानं ठेवला स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव!
Video: सराव, कपडे धुणे, जेवण बनवणे; लॉकडाऊनमध्ये रोहित शर्मा काय करतो?