Sushil Kumar : सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं १ लाखांचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:39 AM2021-05-18T10:39:59+5:302021-05-18T10:40:18+5:30
देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
देशाला दोन ऑलिम्पिक पदकांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्यावर दिल्ली पोलिसांनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नवी दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली आणि त्यात सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार गायब झाला आहे आणि पोलिसांनी आता त्याची माहिती देणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे विविध ठिकाणी छापेसत्र सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले गेले आहे. Video : नको त्या जागी आग लावण्याचा स्टंट पडला महागात, सैरावैरा पळू लागला कुस्तीपटू
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर हा हत्याकांड झाला आणि त्यानंतर सुशील फरार आहे. दिल्ली पोलिसांनी रात्री बक्षीस रक्कम जाहीर केली. सुशीलवर अजामीनपात्र वॉरंट जाहीर झाला आहे. तसेच त्याच्यावर लुकआऊट सर्क्युलरही जारी झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्ली सरकारलाही दिली आहे. छत्रसाल स्टेडियमवर सुशील उप संचालक म्हणून काम पाहत होता आणि तेव्हा तेथे दोन गटांत हाणामारी झाली. यात सागरची हत्या झाली.
Case relating to killing of Sagar Rana at Chhatrasal Stadium | Reward of Rs 1 Lakh on info leading to arrest of wrestler Sushil Kumar announced. Rs 50,000 reward announced for Ajay, who is absconding too: Delhi Police
— ANI (@ANI) May 17, 2021
Non-bailable warrant has been issued against Kumar & others. pic.twitter.com/0gsp04aStm
हरिद्वारमध्ये एका मोठ्या योग गुरुच्या आश्रमात लपलाय सुशील कुमार
दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. जागरणनं दिलेल्या माहितीनुसार रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्रा भुरा यानं दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुशीलची काहिची प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुरा हा सुशीलच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो सुशीलचा बिझनेस सांभाळत होता, परंतु काही वर्षांपूर्वी सुशीलनं त्याच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेत, त्याला दूर केले. त्यानंतर ही जबाबदारी सुशीलनं अजय व भुपेंद्र यांच्याकडे सोपवली. भुपेंद्र हा फरिदाबाद येथे राहणार आहे आणि फरिदाबाद येथे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.