कुस्तीपटू पूजा धांडाचा विक्रम; सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारताला पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:28 PM2018-10-26T15:28:55+5:302018-10-26T15:29:09+5:30
भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.
Next
बुडापेस्ट : भारताच्या पूजा धांडाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूने जिंकलेले हे पहिलेच पदक ठरले. हरयाणाच्या 24 वर्षीय पूजाचे हे जागतिक स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. 57 किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत पूजाने नॉर्वेच्या ग्रेस बुलेनचा 10-7 असा पराभव केला.
Pooja DHANDA gives India a #BudaWrestle2018 world bronze medal 🥉. https://t.co/WmNNF9z4lw
— #BudaWrestle2018 (@wrestling) October 25, 2018
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी भारताच्या अलका तोमर ( 2006), गीता फोगाट आणि बबिता फोगाट ( 2012) यांनी कांस्यपदकाची कमाई केली आहे.
Pooja DHANDA IND wins a world bronze medal at 57kg https://t.co/zJhECwqM2t
— #BudaWrestle2018 (@wrestling) October 25, 2018