Sushil Kumar shifted to Tihar jail : हत्येच्या गुन्ह्याखाली अटक झालेल्या सुशील कुमारसोबत पोलिसांचे सेल्फी अन् फोटोसेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:08 PM2021-06-25T18:08:14+5:302021-06-25T18:08:38+5:30
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) याच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली कोर्टानं त्याच्या न्यायालयीन कोठडीत 9 जुलैपर्यंत वाढ केली आहे
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार ( Sushil Kumar) याच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली कोर्टानं त्याच्या न्यायालयीन कोठडीत 9 जुलैपर्यंत वाढ केली आहे. दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशीलवर कुस्तीपटू सागर धनकर याची हत्या केल्याचा आरोप आहे. मे महिन्यात छत्रसाल स्टेडियमवर घडलेल्या या घटनेनंतर सुशील कुमार फरार होता, दिल्ली पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. इतकेच नव्हे तर त्याची माहिती देणाऱ्यास दिल्ली पोलिसांनी 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 23 मे रोजी सुशीलला पकडण्यात यश आले. शुक्रवारी सुशील कुमारची रवानगी मंडोली जेलमधून तिहार जेलमध्ये करण्यात आली. त्यावेळी सुशीलसोबत पोलिसांनी सेल्फी काढला अन् फोटोसेशनही केलं. पोलिसांच्या अशा वागण्यानं नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत आणि या प्रकरणाचा निकाल काय लागेल, हे त्यांनी आत्ताच ठरवायला सुरूवात केली आहे.
Delhi: Wrestler Sushil Kumar was shifted from Mandoli jail to Tihar jail, today pic.twitter.com/29TEZZw7o7
— ANI (@ANI) June 25, 2021
Policemen taking #selfie with country's only two-time Olympic medallist wrestler #SushilKumar. He has been moved from Mandoli to Tihar jail. He was arrested in connection with a murder of a budding wrestler in Chhatrasal Stadium. pic.twitter.com/K0qGI1kxab
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) June 25, 2021
#SushilKumar
— Rider's on the Storm 🇮🇳 (@RotsJain) June 25, 2021
Puma ki flip flops
asics ki t-shirt
Smiling face#DelhiPolice dying to take selfies
Pls see he's arrested on charges of murder, irony of judiciary pic.twitter.com/itGedoedCV
The utter shameless. The impunity. The remorseless soul. And we knew wrestlers are attached to the soil of our motherland. This is not it.
— Sourav Bhakat (@srv_speaks) June 25, 2021
Hope justice prevails.#SushilKumar#sushilkumararrestedpic.twitter.com/GWWbZOYd6a
तिहाड़ जेल में ट्रांसफर के दौरान सुशील कुमार के साथ सेल्फी लेते दिखे दिल्ली पुलिस के जवान#SushilKumar#DelhiPolicepic.twitter.com/6WRaRmomNL
— RAJESH KUMAR राजेश कुमार (@TheRajeshPoint) June 25, 2021
इससे हम सही इन्वेस्टिगेशन की उम्मीद कर रहे हे #sushilkumar#DelhiPolicepic.twitter.com/LlQWpwlvIS
— Rofl Gandhi 2.0 🏹🚜 (@RoflGandhhi) June 25, 2021
Chal bhayia Selfie 🤳 le le re..
— Mahender Singh Manral (@mahendermanral) June 25, 2021
pictures of two-time Olympic medallist #SushilKumar - who was arrested in connection with the murder of a 23-year-old wrestler at Chhatrasal Stadium. Photo session of Sushil Kumar with police personnel. pic.twitter.com/tkSwiwxZUU
गेल्या महिन्यात राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू सागर धनकड यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीपोलिसांनी सुभाष नावाच्या जूडो प्रशिक्षकाला बुधवारी अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला हा अकरावा आरोपी आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाषला दिल्लीतून अटक केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार (Sushil Kumar) सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यामध्ये आतापर्यंत गँगस्टर कनेक्शन समोर आले आहे. मात्र आता तपासामधून अधिक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ४ आणी ५ मेच्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहोचला. तिथे त्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये पैलवान सागर धनखड गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर पुढच्याच दिवशी सुशील कुमार फरार झाला होता. दरम्यान, १७ दिवसांनंतर २३ मे रोजी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. दरम्यान, या हत्याकांडाशी संबंधित अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.