"तेंडुलकर, कोहली बोलतात का पाहू?", आखाड्याबाहेरील कुस्तीत आव्हाडांची उडी; सरकारवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:07 PM2023-04-28T13:07:31+5:302023-04-28T13:08:04+5:30
jitendra awhad twitter, Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरू असून विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विनेश फोगाटच्या आवाहनानंतर काही क्रिकेटपटूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि कपिल देव यांच्यासह काही खेळाडूंनी पैलवानांसाठी आवाज उठवला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या कुस्तीत उडी घेत कुस्तीपटूंची बाजू मांडली आहे. आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खासदार ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आली. कपिलदेव ह्या भगिनींसाठी उभा राहिला." महिला पैलवानांनी केलेल्या आरोपांवरून भाजपा खासदार ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न आव्हाडांनी सरकारला विचारला आहे.
अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2023
तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू?
सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आलीं…
ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"