"एक महिला म्हणून हे पाहणं खूप अवघड...", सानिया मिर्झासह क्रिकेटपटू कुस्तीगिरांसाठी 'मैदानात'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:40 PM2023-04-28T13:40:56+5:302023-04-28T13:41:21+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील दिग्गज पाठिंबा देत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, पैलवानांचे आंदोलन अद्याप सुरू असून विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे विनेश फोगाटच्या आवाहनानंतर काही क्रिकेटपटूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि कपिल देव यांच्यासह काही खेळाडूंनी पैलवानांसाठी आवाज उठवला आहे.
कुस्तीगिरांसाठी सानिया 'मैदानात'
"एक ॲथलीट आणि एक महिला म्हणून हे पाहणे खूप अवघड आहे. त्यांनी आपल्या देशाला गौरव मिळवून दिले आहे आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद साजरा केला आहे. आता त्यांच्यासोबत उभे राहण्याची वेळ आलेली आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब असून गंभीर आरोप आहेत. मला आशा आहे की सत्य काहीही असले तरी न्याय मिळेल", असे सानिया मिर्झाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले.
As an athlete but more as a woman this is too difficult to watch .. they’ve brought laurels to our country and we have all celebrated them , with them .. if you have done that then it’s time to now stand with them in this difficult time too .. this is a highly sensitive matter… pic.twitter.com/7mVVyz1Dr1
— Sania Mirza (@MirzaSania) April 28, 2023
साक्षी आणि विनेश फोगाट भारताचा अभिमान - भज्जी
Sakshi, Vinesh are India's pride. I am pained as a sportsperson to find pride of our country coming out to protest on the streets. I pray that they get justice.#IStandWithWrestlerspic.twitter.com/hwD9dKSFNv
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 28, 2023
इरफान पठाणने देखील दर्शवला पाठिंबा
Indian athletes are always our pride not only when they get medals for us…
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 28, 2023
— Rani Rampal (@imranirampal) April 28, 2023
आखाड्याबाहेरील कुस्तीचा सहावा दिवस
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"