कुस्तीपटू साक्षी मलिकच्या हातावर सजली मेंहदी

By admin | Published: April 1, 2017 01:52 PM2017-04-01T13:52:25+5:302017-04-01T13:53:31+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Wrestling Rosemary on the Wife of Wrestler Sakshi Malik | कुस्तीपटू साक्षी मलिकच्या हातावर सजली मेंहदी

कुस्तीपटू साक्षी मलिकच्या हातावर सजली मेंहदी

Next

ऑनलाइन लोकमत

रोहतक, दि. 1 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 2 एप्रिल रोजी साक्षी हिचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियान याच्यासोबत विवाह होणार आहे. तिचा विवाहसोहळा आहे. तिच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेहंदी काढण्यासाठी खास दिल्लीहून एका डिझाईनरला बोलावण्यात आले आहे.  
(सिंधूचा ‘फुलराणी’ला धक्का)
 
लग्नसोहळा संस्मरणीय करण्याचे प्रयत्न
साक्षीचं लग्न संस्मरणीय करण्यासाठी स्वतः साक्षी आणि तिचे कुटुंबीय एक कसर सोडत नाहीत. साक्षीची आई सुदेश आणि वडील सुखबीर मलिक यांनी आपल्या लाडक्या लेकीचं लग्न अगदी खास पद्धीतने करण्यासाठी याची जबाबदारी रोहतकमधील एका वेडिंग व इव्हेंट प्लानरवर सोपवली आहे. लग्न घर असल्यामुळे पाहुणे, नातेवाईकांची उपस्थित वाढत आहे. सध्या लग्नापूर्वीच्या विधी केल्या जात आहेत. तर दुसरीकडे सजावटीचे 50 टक्के काम पूर्ण झालं आहे.
 
पंतप्रधान मोदी, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
या हायप्रोफाईल विवाहसोहळ्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासहीत क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्नसोहळ्यासाठी जवळपास 12 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनाही आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय गीता फोगट, बबिता फोगट, पी.व्ही. सिंधू. दीपा कर्माकर सहीत अनेक खेळाडूही हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त काही बॉलिवूड कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.
 

Web Title: Wrestling Rosemary on the Wife of Wrestler Sakshi Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.