राज्यात दहा ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार - तावडे
By Admin | Published: February 4, 2015 02:53 AM2015-02-04T02:53:15+5:302015-02-04T02:53:15+5:30
भविष्यात महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी मल्ल निर्माण व्हावेत, यासाठी राज्यात १० ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार असल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाराष्ट्राला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. भविष्यात महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी मल्ल निर्माण व्हावेत, यासाठी राज्यात १० ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार असल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
हिंदकेसरी सुनील साळुंखे यांनी सोमवारी तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. विनोद तावडे यांनी साळुंखे यांचे अभिनंदन केले. त्या वेळी दोघांमध्ये कुस्तीबाबत चर्चा झाली. भविष्यात कुस्तीचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काय करता येईल, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. तावडे म्हणाले की, कुस्ती खेळाला नावरूप देणे, तसेच महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी मल्ल निर्माण व्हावेत, यासाठी जातीने लक्ष देणार आहोत. यासाठी १० ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारणार आहोत.
२०२०मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके कशी जिंकता येतील याबाबतचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)