पराभवानंतर WWE सुपरस्टार "अंडरटेकर"ने घेतली निवृत्ती
By admin | Published: April 3, 2017 02:17 PM2017-04-03T14:17:46+5:302017-04-03T14:19:36+5:30
90 च्या दशकातील लहानग्यांचा फेव्हरेट "डेडमॅन द अंडरटेकर"ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अलविदा म्हटलं
Next
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 3 - 90 च्या दशकातील लहानग्यांचा फेव्हरेट "डेडमॅन द अंडरटेकर"ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अलविदा म्हटलं आहे. रेसलमेनिया 33 मधील रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर अंडरटेकरने रेसलमेनियामधून निवृत्ती घेतली.
रेसलमेनियाचा मेन इव्हेंट अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यादरम्यान झाला. रोमन रेन्सच्या स्पीयर आणि सुपरमॅन पंचसमोर अंडरटेकर हतबल दिसला आणि त्याचा रेन्सने पराभव केला. यापुर्वी रेसलमेनिया 30 मध्ये ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवलं होतं. रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला. रेसलमेनियात त्याने केवळ 2 पराभवांचा सामना केला तर तब्बल 23 सामने जिंकले.
मॅचनंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभं राहण्याचा प्रय़त्न करत होता पण त्याची हालत नाजूक होती, चाहतेही अंडरटेकरच्या नावाने ओरडत होते, चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी होतं.थोड्यावळाने अंडरटेकरने आपल्या हातातून ग्लव्स, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवली. त्यामुळे डेडमॅनने संन्यास घेतल्याचं स्पष्ट झालं.
SPEAR #4 puts The #Undertaker away as @WWERomanReigns does what only ONE other man has been able to do in nearly 3 decades! #WrestleManiapic.twitter.com/bUewcFLPet
— WWE WrestleMania (@WrestleMania) April 3, 2017
वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट द्वारा आयोजित रेसलमेनियाचा हा 33 वा इव्हेंट होता. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये झालेल्या या इव्हेटंला 65 हजार लोकांनी लाईव्ह पाहिलं. 1990 मध्ये अंडरटेकर डब्लयूडब्लयूईमध्ये आला होता. 23 वेळेस रेसलमेनियाच्या रिंगमध्ये उतरून केवळ 2 वेळेस डेडमॅनला पराभवलाचा सामना करावा लागला.
अंडरटेकरचं म्यूझिक वाजल्यानंतर संपूर्ण एरिनामध्ये काळोख पसरतो आणि अचानक डेडमॅन द अंडरटेकर रिंगमध्ये उभा दिसतो. इतकी वर्ष झाल्यानंतरही अंडरटेकरची ही एन्ट्री दर्शकांना खूप आवडायची.
#ThankYouTaker#WrestleManiapic.twitter.com/koSpEN7iOh
— WWE (@WWE) April 3, 2017