यशस्विनी देसवालचा सुवर्णवेध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 03:06 AM2019-09-02T03:06:18+5:302019-09-02T03:07:19+5:30

आयएसएसएफ विश्वचषक : भारताने मिळवला आॅलिम्पिक नेमबाजीतील नववा कोटा

Yashwini Deswal's gold medal! in shooting competition | यशस्विनी देसवालचा सुवर्णवेध!

यशस्विनी देसवालचा सुवर्णवेध!

Next

रिओ-डी-जानेरिओ : यशस्विनी देसवालने जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज ओलेना कोस्तेविचला पिछाडीवर सोडत येथे आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेमध्ये शनिवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यासह तिने भारताला नववा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.

माजी ज्युनिअर विश्व चॅम्पियन २२ वर्षीय यशस्विनीने ८ महिलांच्या अंतिम फेरीमध्ये २३६.७ चा स्कोअर नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या युक्रेनच्या ओलेना कोस्तेविचला २३४.८ अंकांसह रौप्य व सर्बियाच्या जेसमिना मिलावोनोविचला २१५.७ अंकांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या यशस्विनीच्या वर्चस्वाची कल्पना तिने अंतिम फेरीत ओलेनाच्या तुलनेत १.९ गुणांच्या घेतलेल्या आघाडीवरुन येते. पात्रता फेरीत ती ५८२ गुणांसह अव्वल स्थानी होती. या चमकदार कामगिरीच्या जोरावर यशस्विनीने २०२० टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातर्फे कोटा स्थान मिळवणारे नेमबाज संजीव राजपूत, अंजुम मोदगिल, अपूर्वी चंदेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार, राही सरनोबत आणि मनू भाकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. रिओमध्ये भारतातर्फे हे तिसरे सुवर्ण ठरले. अभिषेक वर्मा व इलावेनिल वलारिवान यांनी अनुक्रमे पुरुष १० मीटर एअर पिस्तुल व महिलांच्या १० मीटर रायफल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. 

काजल सैनी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ११६७ च्या स्कोअरसह पात्रता फेरीत २२ व्या तर तेजस्विनी सावंत ११५६ गुणांसह ४७ व्या स्थानी राहिली. अनुराज सिंग व श्वेता सिंग यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही तर मनू भाकरने किमान पात्रता स्कोअरमध्ये ५८० अंक मिळवले.
 

Web Title: Yashwini Deswal's gold medal! in shooting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.