यासिर भेदक, इंग्लंडचीही घसरगुंडी

By Admin | Published: July 16, 2016 02:34 AM2016-07-16T02:34:29+5:302016-07-16T02:34:29+5:30

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा मोहम्मद आमीरला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विशेष छाप सोडता आली नाही.

Yasir Bhadakak, England's Slump | यासिर भेदक, इंग्लंडचीही घसरगुंडी

यासिर भेदक, इंग्लंडचीही घसरगुंडी

googlenewsNext

लंडन : स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीचा सामना केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा मोहम्मद आमीरला इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत विशेष छाप सोडता आली नाही. दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत त्याला केवळ एक बळी बाद करता आला.
त्याआधी, अष्टपैलू ख्रिस व्होक्सने कारकीर्दीत सर्वोत्तम कामगिरी करीत ७० धावांत ६ गडी बाद करताच कालच्या ६ बाद २८२ वरून पुढे खेळणाऱ्या पाकला इंग्लंडने ३३९ धावांत रोखले.
प्रत्युत्तरात इंग्लंडचीे शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद २५३ अशी अवस्था झाली होती.आजचा खेळ थांबला त्यावेळी ३१ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या व्होक्सला स्टुअर्ट ब्रॉड (११) साथ देत होता. आमीरच्या चेंडूवर सुरुवातीला सुदैवी ठरलेल्या अ‍ॅलिस्टर कूकला (८१) त्यानंतर त्यानेच बाद केले. कुकने या खेळीदरम्यान सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक ९६०७ धावा फटकावण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला. कूकला २२ धावांवर मोहम्मद हाफिजने पहिल्या स्लिपमध्ये जीवदान दिले. पाकिस्तातर्फे फिरकीपटू यासिर शाह याने ६४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्याआधी पाकने ६ बाद २८२ वरुन पुढे खेळ सुरू केला. कर्णधार मिस्बाह उल हक याने शतकी(११४ धावा) खेळी केली. पण तो बाद होताच पाकचे सहा धावांत आणखी तीन फलंदाज बाद झाले. सर्फराज अहमद याने झटपट २५ धावा काढल्या. मोहम्मद आमीरने १२ धावांचे योगदान दिले.(वृत्तसंस्था)

मिस्बाह बनला कसोटी शतक ठोकणारा वयोवृद्ध कर्णधार
पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत गुरुवारी शतक झळकविताच कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा सर्वाधिक वयाचा कर्णधार म्हणून त्याने विक्रमाची नोंद केली. नाबाद ११० धावा ठोकणाऱ्या मिस्बाहचे वय ४२ वर्षे ४७ दिवस इतके आहे. त्याने आॅस्ट्रेलियाच्या बॉब सिम्पसन यांना मागे टाकले. १९७७-७८ मध्ये सिम्पसन यांनी अ‍ॅडिलेडमध्ये भारताविरुद्ध ४१ वर्षे ३५९ दिवस वय असताना शतक ठोकले होते.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद ३३९ (मिसबाह ११४, सर्फराज २५, व्होक्स ६-७०).
इंग्लंड पहिला डाव ७१ षटकांत ७ बाद २५३ (अ‍ॅलिस्टर कुक ८१, रुट ४८, व्होक्स नाबाद ३१, यासिर शाह ५-६४, अली व मोहम्मद आमीर प्रत्येकी १ बळी.)

Web Title: Yasir Bhadakak, England's Slump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.