यंदा ‘खेलरत्न’ कुणालाही नाही

By admin | Published: August 13, 2014 01:36 AM2014-08-13T01:36:24+5:302014-08-13T01:36:24+5:30

मंगळवारी झालेल्या १२ सदस्यीय समितीच्या बैठकीत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्यासह १५ जणांच्या नावाची शिफारस मात्र अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे

This year there is no one like Khel Ratna | यंदा ‘खेलरत्न’ कुणालाही नाही

यंदा ‘खेलरत्न’ कुणालाही नाही

Next

नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या अशा सर्वोच्च पुरस्कारासाठी यंदा सात नावे चर्चेत होती; पण यातील एकाही खेळाडूच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी न करण्याचा निर्णय माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीने घेतला.
मंगळवारी झालेल्या १२ सदस्यीय समितीच्या बैठकीत आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याच्यासह १५ जणांच्या नावाची शिफारस मात्र अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. खेलरत्न पुरस्कार १९९१ साली सुरू करण्यात आला. तेव्हापासून हा पुरस्कार कुणालाही न देण्याची ही तिसरी वेळ आहे.
‘खेलरत्न’साठी आवश्यक असलेल्या अटी व शर्र्थींची पूर्तता करण्यात सातपैकी एकही खेळाडू फिट नसल्यामुळे यंदा एकाच्याही नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात आली नसल्याची माहिती निवड समितीतील सदस्याने आपले नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (वृत्तसंस्था)


 

Web Title: This year there is no one like Khel Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.