योगेश्वर दत्तला रौप्य नाही तर सुवर्णपदक मिळण्याची शक्यता
By admin | Published: September 2, 2016 07:06 PM2016-09-02T19:06:24+5:302016-09-02T19:06:24+5:30
२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वरला सुवर्णपदक दिलं जाण्याची शक्यता आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच लढतीत पराभवाला झाल्यानंतर टीकेला सामेरं जावं लागलेल्या पैलवान योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकसाठी रौप्य नाही तर सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वरला सुवर्णपदक दिलं जाईल. रौप्य जिंकणारा रशियाचा मल्ल लेट बेसिक कुडुकोव्ह याच्यानंतर आता सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह हादेखील डोपिंगध्ये ‘फेल’ झाल्याने योगेश्वरला सुवर्णपदक बहाल करण्यात येईल.
योगेश्वर हा लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच मल्ल ठरेल. लंडनमध्ये सुशीलकुमारने ६६ किलोगटात रौप्यपदक जिंकले होते.
२००८च्या बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णविजेता उझबेकिस्तानचा (१२० किलो) मल्ल आर्थर त्यामाझोव्ह हा उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे निष्पन्न होताच त्याचे पदक गोठविण्यात आले होते. त्यानंतर त्याचे रौप्यपदक योगेश्वर दत्तला दिलं जाईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र योगेश्वर दत्तने मानवी संवेदना माझ्या पदकापेक्षा मोठ्या असल्याचं सांगत रौप्यपदक दिवंगत रशियन मल्लाच्या कुटुंबीयांकडेच कायम राहू द्या, असे आवाहन केले होते.
लंडनमध्ये कुडुकोव्ह हा सुवर्णपदकाच्या कुस्तीत अझरबैझानचा तोगरुल असगारोव्ह याच्याकडून पराभूत झाला होता. तो चार वेळेचा विश्वविजेता तसे २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकचा कांस्यविजेता होता. नंतर रशियात झालेल्या कार अपघातात वयाच्या २७व्या वर्षी त्याचे निधन झाले. मात्र आता कुडुकोव्हदेखील डोपिंगध्ये ‘फेल’ झाला आहे. योगश्वर दत्तचीदेखील डोपिंग चाचणी केली जाणार असून तो पास झाल्यास सुवर्णपदकावर त्याचं नाव कोरण्यात येईल.
६० किलोगटात योगेश्वरला रौप्यपदक मिळाल्यानंतर त्याच्याकडून कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झालेला उत्तर कोरियाचा रिजोंग मियोंग हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. मात्र योगेश्वरला सुवर्णपदक मिळाल्यास रिजोंग मियोंगला रौप्य मिळेल.