मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!

By admin | Published: August 31, 2016 04:55 AM2016-08-31T04:55:57+5:302016-08-31T04:55:57+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्या लढतीत पराभूत होताच रिकाम्या हाताने परतलेला योगेश्वर दत्त याच्यासाठी खुशखबर आहे. २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल

Yogeshwar Dutt's medal will change color! | मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!

मल्ल योगेश्वर दत्तच्या पदकाचा रंग बदलणार!

Next

लंडन : रिओ आॅलिम्पिकमध्ये पहिल्या लढतीत पराभूत होताच रिकाम्या हाताने परतलेला योगेश्वर दत्त याच्यासाठी खुशखबर आहे. २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमधील ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या योगेश्वरला रौप्यपदक दिले जाईल. त्या वेळी रौप्य जिंकणारा रशियाचा मल्ल लेट बेसिक कुडुकोव्ह हा डोपिंगध्ये ‘फेल’ झाल्याने त्याचे पदक योगेश्वरला बहाल करण्यात येईल, असे युनायटेड कुस्तीने म्हटले आहे.
योगेश्वर हा लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा दुसरा मल्ल ठरेल. लंडनमध्ये सुशीलकुमारनेदेखील ६६ किलोगटात रौप्यपदक जिंकले होते.
२००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचा सुवर्णविजेता उझबेकिस्तानचा (१२० किलो) मल्ल आर्थर त्यामाझोव्ह हा उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे निष्पन्न होताच त्याचे पदक गोठविण्यात आले आहे.
लंडनमध्ये कुडुकोव्ह हा सुवर्णपदकाच्या कुस्तीत अझरबैझानचा तोगरुल असगारोव्ह याच्याकडून पराभूत झाला होता. तो चार वेळेचा विश्वविजेता तसे २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्यविजेता होता. नंतर रशियात झालेल्या कार अपघातात वयाच्या २७व्या वर्षी त्याचे निधन झाले.
६० किलोगटात योगेश्वरला रौप्यपदक मिळाल्यानंतर त्याच्याकडून कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झालेला उत्तर कोरियाचा रिजोंग मियोंग हा कांस्यपदकाचा मानकरी ठरेल.


मला मंगळवारी सकाळीच कळले की माझे आॅलिम्पिक पदक
आता रौप्यपदकामध्ये बदलले आहे. मी हे पदक देशवासीयांना समर्पित करतो.- योगेश्वर दत्त

Web Title: Yogeshwar Dutt's medal will change color!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.