योगेश्वरचे स्वप्न भंगले
By admin | Published: September 9, 2015 02:29 AM2015-09-09T02:29:37+5:302015-09-09T02:29:37+5:30
लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने पाहिेलेले वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे, घोट्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
नवी दिल्ली : लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त याने पाहिेलेले वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे, घोट्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ही स्पर्धा आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची संधी आहे. लंडन आॅलिम्पिकचा रौप्यपदक विजेता सुशीलकुमार खांद्याच्या दुखापतीमुळे यापूर्वीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे सर्व आशा योगेश्वरवर होत्या. परंतु घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडण्यास भाग पाडले.
६५ किलो ग्रॅम वजन गटात खेळणाऱ्या योगेश्वरला डॉक्टर्सनी स्पर्धेत सहभागी होण्यास अनफिट ठरविले. त्याला दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय त्याला घोट्याचे
आणखी एक शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आली आहे. त्याचे यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत एक आॅपरेशन झाले आहे.
या स्पर्धेत खेळण्यासाठी योगेश्वर उत्सुक होता. परंतु भारतीय
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणशरण सिंग यांनी त्याला थांबण्याचा सल्ला दिला. पुढील पात्रता स्पर्धेत फिट राहण्यासाठी या स्पर्धेत न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला. योगेश्वरला २00९ सालीही वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून घोट्याच्या दुखापतीमुळेच बाहेर पडावे
लागले होते.