माझ्यापासून गांगुलीला काय प्रॉब्लेम ते तुम्ही त्यालाच विचारा - रवी शास्त्री
By admin | Published: June 28, 2016 10:39 AM2016-06-28T10:39:31+5:302016-06-28T10:40:03+5:30
संघ संचालक म्हणून आपली जबाबदारी चोख बजावल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - संघ संचालक म्हणून आपली जबाबदारी चोख बजावल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत. बँकॉकमध्ये सुट्टया घालवून परतलेल्या रवी शास्त्री यांच्याशी टाइम्स ऑफ इंडियाने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवड न झाल्याने मी निराश झालो होतो. पण ती त्या दिवसापुरता निराशा होती. आता मी पुढचा विचार करत आहे असे त्यांनी सांगितले.
तुमची मुलाखत सुरु असताना गांगुली का उठून गेला ? तुमच्यामध्ये काय मतभेद आहेत ? या प्रश्नावर शास्त्री यांनी तुम्ही गांगुलीलाच विचार त्याला माझ्या पासून काय प्रॉब्लेम आहे असे उत्तर दिले. मागच्या आठवडयात बीसीसीआयने नेमलेल्या सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या त्रिसदस्यीय समितीने प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेच्या नावाला पसंती दिली.
त्यामुळे अठरा महिने संघ संचालक म्हणून संघासोबत असलेल्या रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदाची संधी हुकली. ते प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार होते.
माझ्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात प्रतिभावंत खेळाडूंमुळे संघाने अनेक गोष्टी साध्य केल्या. कसोटीमध्ये पहिले स्थान मिळवल्यानंतर एकदिवसीय आणि टी-२०मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशात संघाने चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत सातत्य आवश्यक असून अनिल कुंबळे गोलंदाजांना मदत करायला आहे. गोलंदाजीत सुधारणा आवश्यक असून, माझ्या कार्यकाळात संघाने चांगली कामगिरी केली. मला कुठलाही खेद नाही असे शास्त्री यांनी सांगितले.