जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली
By admin | Published: June 12, 2017 01:48 PM2017-06-12T13:48:23+5:302017-06-12T14:19:51+5:30
श्रीलंकेकडून झालेल्या पराभवापासून धडा घेत भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - जिंकण्यासाठी अनेकदा तुम्हाला कटू बोलावं लागतं. ज्यामुळे तुमचे सहकारी दुखावले जातात. पण जी चूक झालीय ती मान्य करुन सुधारणा केली पाहिजे. त्यासाठीच लाखो लोकांमधून या स्तरावर खेळण्यासाठी तुमची निवड झाली आहे अशा शब्दात कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
श्रीलंकेकडून झालेल्या पराभवापासून धडा घेत भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले. पराभव झाल्यानंतर तुम्हाला परत उठून उभे राहावे लागते. सारख्या सारख्या त्याच त्याच चूका करुन चालत नाही. मी दोन-तीन खेळाडूंना सुधारणा करायला सांगत नाहीय. संघातील प्रत्येक खेळाडूने खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे आणि आज आम्ही चांगली कामगिरी करुन दाखवली. आज आम्ही उत्कृष्ट सांघिक खेळ केला जो समाधान देणारा होता असे विराट म्हणाला. उपांत्यफेरीत भारताचा सामना गुरुवारी बांगलादेश विरुद्ध होणार आहे.
ज्या चूका झाल्यात त्या दाखवल्या पाहिजेत पण समोरचा खेळाडू दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण ते सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. संघातील खेळाडूंशी कसे बोलायचे, कशा पद्धतीने चर्चा करायची ते तुम्हाला समजले पाहिजे असे कोहली म्हणाला. या स्तरावर खेळताना आपण कशी कामगिरी केली पाहिजे हे प्रत्येक क्रिकेटपटूला ठाऊक असते असे कोहली म्हणाला. प्रत्येकवेळी शांत राहणे सोपे नसते हे त्याने कबूल केले. श्रीलंकेविरुद्धच्या मानसिक खच्चीकरण करणा-या पराभवानंतर संघाने जी कामगिरी करुन दाखवली त्यावर कर्णधार म्हणून कोहली आनंदी आहे.
नाणेफेक जिंकणे चांगले राहिले. खेळपट्टी विशेष काही बदललेली नव्हती. फलंदाजीसाठी ती पोषक होती. आज आमचे क्षेत्ररक्षण चांगले राहिले आणि त्यांना गोलंदाजांनीही पूर्ण साथ दिली. जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्हाला फायदा घ्यायला हवा. डिव्हिलियर्सला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरलो हे आमच्यासाठी चांगले होते. कारण तो तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो असे कोहली म्हणाला.