पुणेरी पलटनवर यू मुंबा ‘भारी’

By admin | Published: August 17, 2015 10:51 PM2015-08-17T22:51:57+5:302015-08-17T22:51:57+5:30

पुन्हा एकदा तगड्या यू मुंबाने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवताना यजमान पुणेरी पलटनला त्यांच्या घरच्या मैदानावर ३९-३४ असे लोळवले. विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांनी

You Mumba 'heavy' at the Punei Paltan | पुणेरी पलटनवर यू मुंबा ‘भारी’

पुणेरी पलटनवर यू मुंबा ‘भारी’

Next

विशाल शिर्के, पुणे
पुन्हा एकदा तगड्या यू मुंबाने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवताना यजमान पुणेरी पलटनला त्यांच्या घरच्या मैदानावर ३९-३४ असे लोळवले. विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या राखीव खेळाडूंना संधी दिली आणि यामध्ये मुंबईच्या नवोदितांनी मिळालेली संधी साधताना पुणेकरांना आपला हिसका दाखवला. या विजयासह यू मुंबाने ६० गुणांसहित अव्वल स्थान भक्कम केले असून, त्यांचा पुढील सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध मंगळवारी होईल. तर, पुणेरी पलटन प्रतिष्ठा जपण्यासाठी घरच्या मैदानावर मंगळवारी व बुधवारी अनुक्रमे पटणा पायरेट्स व बंगळुरू बुल्स विरुध्द लढेल.
कर्णधार अनुप कुमार, शब्बीर बापू, विशाल माने आणि रिशांक दिवाडिगा या चार स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन मैदानात उतरलेल्या यू मुंबाने पुणेकरांना सहज लोळवले. या दिमाखदार विजयासह मुंबईकरांनी इतर प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा
इशारा देताना आपली दुसरी फळी देखील मजबूत असल्याचे दाखवले. प्रदीप कुमारच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या यू मुंबाने आक्रमक खेळ करताना पुणेकरांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पुणेरी पलटनेदेखील तोडीस तोड खेळ करताना मध्यंतराला १३-१३ अशी बरोबरी साधत सामन्यातील आव्हान कायम ठेवले.
यानंतर मात्र यू मुंबाच्या खेळाडूंनी तुफान आक्रमण करताना यजमानांची हवा काढली. प्रदीपने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना एकहाती दबदबा राखला. तर फझेल अत्राचली आणि भूपेंद्र सिंग यांनी नेत्रदीपक पकडी करून पुणेकरांना जेरीस आणले. पुण्याकडून मनोज कुमार, मनोज धुल आणि अमित राठी यांनी अपयशी झुंज दिली. या सामन्यात पुणेरी पलटनला हुकमी वझीर सिंगची अनुपस्थिती जाणवली.

Web Title: You Mumba 'heavy' at the Punei Paltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.