राणासारखे युवा खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्य!
By admin | Published: April 21, 2017 11:35 PM2017-04-21T23:35:05+5:302017-04-21T23:35:05+5:30
मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार!
रवि शास्त्री लिहितात...
मुंबईविरुद्ध दिल्ली हा आयपीएलचा सामना आज, शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात धडाकेबाज युवा खेळाडूंची बहारदार कामगिरी अनुभवायला मिळणार! पांड्या आणि राणा; नायर आणि अय्यर या खेळाडूंनी स्वत:च्या कामगिरीमुळे कमालीची लोकप्रियता कमावली आहे. ऋषभ पंत हा आणखी एक चांगला खेळाडू. या सर्व खेळाडूंमध्ये राणाला स्वत:ची ओळख सांगण्याची वेळ राहिलेली नाही. शिवाय या खेळाडूंना कुठल्याही संघाविरुद्ध कामगिरी उंचावण्यास वेळ लागणार नाही.
राणाची चमक तर कुणाच्याही ध्यानीमनी नव्हती. तो धडाका
करेल, असे कुणी भाकितही केले नव्हते. मुंबई इंडियन्सच्या बाकावर बसणारा हा युुवा खेळाडू आता संघाच्या चाव्या सांभाळायला लागला आहे. प्रत्येकाचा विश्वास त्याने कमावला आहे. मैदानात असेल तेव्हा प्रत्येक क्षणाला वर्चस्व गाजवितो. २०१७ चे आयपीएल सत्र माझे आहे, असा जणू काही तो इशाराच देत आहे.
राणा हा गोलंदाजांसाठी ‘कोडे’ ठरलेला फलंदाज आहे. त्याला चेंडू कसा टाकावा, हे देखील अनेकांना समजत नसावे. त्याच्या हातात वेग आणि मनगटात ताकद असल्याने वेगाने बॅट फिरविण्यात तरबेज वाटतो. सध्याच्या पर्वात त्याच्यापेक्षा जास्त षट्कार कुणी मारले नसावते, यावरून राणाची फटकेबाजी लक्षात येते.
राणा मुंबईसाठी जी कामगिरी करू शकतो तशीच कामगिरी दिल्लीसाठी श्रेयस अय्यर हा देखील करू शकतो. दोघेही सारख्याच वयाचे आहेत. या स्पर्धेत युवा खेळाडू सर्वाधिक जोखीम पत्करून खेळतात. त्यात दिल्ली आणि मुंबई संघात युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आहे; पण या युवा खेळाडूंनी सावध खेळ करायलाच हवा. जोखीम पत्करण्याच्या नावाखाली चुका करू नये. पंतने हैदराबादविरुद्ध मोठी चूक करीत युवराजच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरकडे सोपा झेल दिला होता. पांड्या बंधू आणि ऋषभ पंत हे क्रिकेटचे भविष्यातील ब्रँड बनू शकतात.
याच मालिकेत संजू सॅमसन याला विसरता येणार नाही. २३ वर्षांच्या या खेळाडूने आयपीएलचे पहिले शतक ठोकले. करुण नायर आणि जसप्रीत बुमराह हे देखील या खेळातील स्वमर्जीचे मालक आहेत. यामुळेच माझ्या मते वानखेडे स्टेडियमवर भारतीय टी-२० क्रिकेटचे भविष्य आपापले कौशल्य पणाला लावताना दिसणार आहे. (टीसीएम)