युवा जेरेमीने जिंकले रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 05:34 AM2019-02-09T05:34:13+5:302019-02-09T05:34:25+5:30
युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे.
नवी दिल्ली : युवा आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता जेरेमी लालरिनुगाने शुक्रवारी पुरूष गटात ६७ किलो मध्ये रौप्य पदकाची कमाई करत थायलंडच्या चियांग माईमध्ये सुरू असलेल्या ईजीएटी कप आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक मिळवले आहे.
१६ वर्षीय जेरेमीने स्नॅचमध्ये १३१ किलो आणि क्लिन अॅण्ड जर्कमध्ये १५७ किलो वजन उचलले. एकुण २८८ किलो वजन उचलले. मिझोरामचा हा भारोत्तलक इंडोनेशियाच्या सुवर्णपदक विजेत्या डेनी पेक्षा खुप मागे राहिला. त्याने ३०३ किलो (१३२ आणि १७१ किलो) वजन उचलले. रुबेन काटोयाताऊने २८५ किलो (१२५ आणि १६० किलो) वजन उचलले.
ही स्पर्धा सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक क्वालिफाईंग स्पर्धा आहे. यातील गुण टोकियो २०२० मध्ये कट मिळवणाऱ्यांच्या अंतिम रँकिंगमध्ये मिळवले जातील. स्वाती सिंग (१९५ किलो) व कोपार्थी शिरीषा (१८९ किलो) ५९ किलो गटात अनुक्रमे सहा आणि नवव्या स्थानी राहिले.
गुरूवारी विश्व चॅम्पियन साईखोम मीराबाई चानू हीने महिला गटात ४९ किलो मध्ये सुवर्ण पदक मिळवले होते.