युवा आॅलिम्पिक; मनू भाकरने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:00 AM2018-10-08T03:00:49+5:302018-10-08T03:01:35+5:30

यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती.

Young Olympic; Manu Bhakar made the leadership of the Indian team | युवा आॅलिम्पिक; मनू भाकरने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

युवा आॅलिम्पिक; मनू भाकरने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

googlenewsNext

ब्युनास आयर्स : युवा नेमबाज मनू भाकरने युवा आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात ध्वजवाहक म्हणून भारतीय पथकाचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, या स्पर्धेचा उद््घाटन समारंभ प्रथमच रस्त्यावर झाला. हा कार्यक्रम बघण्यासाठी यावेळी दोन लाखांपेक्षा अधिक प्रेक्षक पोहोचले होते.
यावेळी समारंभादरम्यान आतषबाजीही झाल्याने रात्री ब्युनास आयर्सचे आकाश उजाळून निघाले. या कार्यक्रमासाठी थायलंडच्या ‘वाईल्ड बोर्स’ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते आणि या पथकाची आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी प्रशंसा केली होती.
वाईल्ड बोर्स पथक जूनमध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यावेळी हे पथक थायलंडच्या चांग राई प्रांत आलेल्या पुरात पाणी व गाळ असलेल्या एका गुहेमध्ये जवळजवळ दोन आठवडे अडकले होते. बाक यांनी पथकाच्या धैर्याची प्रशंसा केली होती. कार्यक्रमादरम्यान गाण्याव्यतिरिक्त टँगो नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
या स्पर्धेसाठी ब्युनास आयर्समध्ये २०६ संघांचे १५ ते १८ वर्षांचे चार हजार खेळाडू सहभागी होतील. भारताचे ४६ खेळाडूंसह ६८ सदस्यांचे पथक अर्जेंटिनामध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेदरम्यान १३ क्रीडा प्रकारामध्ये आव्हान सादर करणार आहे. युवा आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे भारताचे हे सर्वांत मोठे पथक आहे. हॉकी फाईव्समध्ये सर्वाधिक १८ भारतीय खेळाडू (पुरुष व महिला संघांतील प्रत्येकी ९ खेळाडू) सहभागी होत आहे तर मैदानी स्पर्धेत भारताचे सात खेळाडू सहभागी होतील.
नेमबाजीमध्ये चार, रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये दोन, बॅडमिंटनमध्ये दोन, जलतरणामध्ये दोन, टेबलटेनिसमध्ये दोन, भारोत्तोलनमध्ये दोन, कुस्तीमध्ये दोन व रोर्इंगमध्ये दोन तर बॉक्सिंग, ज्युडो व स्पोर्ट््स क्लाइंबिंगमध्ये प्रत्येकी एक भारतीय स्पर्धेत आव्हान सादर करणार आहे. (वृत्तसंस्था)

नेमबाज शाहू तुषार माने याचा रौप्य वेध
नेमबाज शाहू तुषार मानेने पुरुषांच्या १० मी. एअर रायफल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करीत युवा आॅलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला पदकाचे खाते उघडून दिले. तिसऱ्या स्थानावर फायनल्ससाठी पात्रता मिळवणाºया मानेने २४७.५ गुणांसह दुसरे स्थान पटाकावले तर ग्रिगोरी शामाकोव्हने २४९.२ गुणांसह सुवर्ण पदकावले.
सर्बियाच्या एलेक्सा मित्रोविचने २२७.९ गुणांसह कांस्य जिंकले. फायनल फेरीपूर्वी मानेने २२८ तर मित्रोविचने २२७.९ गुण मिळवले. अंतिम फेरीत भारतीय नेमबाजाने ९.६ व ९.९९ गुण मिळवले, तर सुवर्णपदक विजेत्या शामाकोव्हने १०.४ व १०.७ गुणांचे नेम साधून वर्चस्व राखले.

Web Title: Young Olympic; Manu Bhakar made the leadership of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी